मौलाना जौहर विद्यापिठावर बुलडोझर कारवाई होऊ देणार नाही... आजाद समाज पार्टी रस्त्यावर
मौलाना जौहर विद्यापिठावर बुलडोझर कारवाई होऊ देणार नाही, आजाद समाज पार्टी रस्त्यावर...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) - आजाद समाज पार्टी (कांशीराम)चे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांच्या आदेशानुसार देशभरातील सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांसमोर दिनांक 25 जुलै 2026 रोजी आंदोलन करण्यात आले. त्यानुसार आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा युनिटच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी मा. अरविंद कांबळे आणि जिल्हाध्यक्ष मा. विजय देवराव शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात भव्य धरणे-निदर्शने आंदोलन करण्यात आले.
दिल्ली येथील जंतर-मंतरवर सोमन वांगचुक आणि अभिजीत दीपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत हे आंदोलन करण्यात आले.
प्रमुख मागण्या
- NEET पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा.
- दिल्लीतील शांततापूर्ण विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध करण्यात यावा.
- - उत्तर प्रदेशातील मौलाना जौहर विद्यापीठावरील कारवाईची निष्पक्ष चौकशी करून न्याय द्यावा. उत्तर प्रदेश येथील मौलाना जौहर विद्यापिठावर बुलडोझर कारवाई होऊ देणार नाही यासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अरविंद कांबळे यांनी दिला आहे.
या आंदोलनात मा. अरविंद कांबळे (प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी), मा. विजय देवराव शिनगारे (जिल्हाध्यक्ष), मा. काशिनाथ भांडेगावकर (मराठवाडा महासचिव), मा. तातेराव ससाणे (मराठवाडा कार्याध्यक्ष), मा. राहुल साबळे (जिल्हा प्रभारी), मा. अनामी मोरे (युवा जिल्हाध्यक्ष), मा. शेख जावेद (शहराध्यक्ष), मा. हकीम शेख (अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष), मा. विजय भिमसाने (जिल्हा उपाध्यक्ष), मा. सलमान पठाण (जिल्हा उपाध्यक्ष), नवाब पटेल (पश्चिम शहराध्यक्ष – अल्पसंख्यांक आघाडी), राजू गवारगुर (जिल्हा महासचिव), शरद थोरात (जिल्हा महासचिव), शेख फिरोज (कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष), शेख जुबेर (वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष), सागर अंभोरे (युवा जिल्हा सचिव), मा. अमोल सोनवणे (शहर सचिव), शेख समीर (मध्य विधानसभा अध्यक्ष), दिनेश नरवडे (तालुका उपाध्यक्ष, गंगापूर), दीपक सदावर्ते (युवा जिल्हा महासचिव), मोहम्मद भाई (दौलताबाद शहराध्यक्ष), आकाश आव्हाड, संतोष इंगळे, शेख मुनीर, सय्यद कलीम टेलर, नुरजहा शेख मॅडम, मुस्तकीम शेख, मोहम्मद हसन, शेख महबूब भाई, अजीम भाई, नाजीम भाई, जमीन बाजी, मिर्झा सेफ अली, अब्दुल वहाब चाऊस, सिकंदर भाई, सिकंदर पटेल, शारदाताई, आजीबाई तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनाच्या शेवटी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनातील मागण्या तातडीने मान्य कराव्यात व संबंधित प्रकरणांमध्ये न्याय्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच आंदोलनकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत, लोकशाही मार्गाने केलेल्या संघटित आंदोलनाची ताकद मोठी असते आणि जनतेच्या आवाजाचा सन्मान झाला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
What's Your Reaction?