शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, काॅकरोच जनता पार्टीचा क्रांतीचौकात जल्लोष...
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, काॅकरोच जनता पार्टीचा जल्लोष
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) - दुपारी दोन वाजेनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर देशभरात काॅकरोच जनता पार्टीच्या वतीने जल्लोष करण्यात आला. क्रांतीचौक येथे विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.
मागिल 20 जूलै पासून कथित नीट परीक्षा लिक प्रकरणी दिल्ली येथे काॅकरोच जनता पक्षाचे बेमुदत आंदोलन सुरू होते. समाजसेवक सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर काॅकरोच जनता पार्टीचे सर्वेसर्वा अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीवर ठाम भूमिका घेत आंदोलन सुरुच ठेवले होते. 20 जूलै रोजी संसदेवर मोर्चा घेऊन जाताना विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला होता यामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले होते तेव्हापासून देशभरात विद्यार्थी अक्रामक होत तीव्र आंदोलन सुरू होते. सरकारला आज दुपारी दोन वाजेपर्यंत शिक्षणमंत्री यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलकांनी वेळ दिला होता. सरकार आंदोलन पुन्हा चिघळू नये म्हणून बॅकफूटवर येत शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतला तेव्हा अभिजित दिपके व विद्यार्थ्यांनी जंतरमंतर वर जल्लोष केला. हे माझ्या एकट्याचे यश नाही विद्यार्थ्यांचे एकजुटीचे यश आहे. माझे वैयक्तिक गुणगान करु नका एका व्यक्तीचे देशाने गुणगान केल्याने आज देश मोठी किंमत चुकवावी लागत आहे. एका व्यक्तीला महत्व देत असल्याने ते संविधानाने मोठे झाले असे वाटत आहे म्हणून या यशाचे श्रेय मला देवू नये असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर तीन मागणी सरकारने मान्य केली आहे यामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, ज्या नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई, 20 जूलै नंतर ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले ते मागे घेतले जाईल असे सरकारने जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.
या यशानंतर अभिजित दिपके यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. आई वडील भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आईने भावना व्यक्त करताना सांगितले मागिल 36 दिवसांपासून हा लढा सुरू होता. माझ्या लेकराच्या कष्टाचे चिज झाले अशी भावना अभिजितच्या आईने व्यक्त केली. क्रांतीचौकात विद्यार्थी व विरोधी पक्षांनी आनंदोत्सव साजरा केला. यानंतर कोणत्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?