गिफ्ट पाऊचमध्ये चक्क आढळले S I R फाॅर्म, एमआयएमचा आरोप, चौकशीची मागणी करणार...!
गिफ्ट पाऊचमध्ये चक्क आढळले S I R फाॅर्म, एमआयएमचा आरोप...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज) - महाराष्ट्रात S I R चे फाॅर्म भरणे सुरु आहे. मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. हे अर्ज मुदतीत भरण्यासाठी मतदारांची धावपळ सुरू असताना छत्रपती संभाजीनगर शहरातील अंगुरीबाग भागात एका किराणा दुकानात S I R चे ओरीजिनल गणना प्रपत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याची माहिती एमआयएमचे नगरसेवक मोहम्मद असरार यांनी केली आहे.
त्या दुकानदाराने अगोदर हि माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना दिली त्यानंतर त्यांच्या आदेशानंतर नगरसेवक मोहम्मद असरार यांनी या किराणा दुकानात धाव घेतली असता लहान बालकांसाठी गिफ्ट पाऊच विक्रीसाठी आले असताना ते उघडून बघितले. गिफ्ट ओरीजिनल गणना प्रपत्र( S I R Form) गिफ्ट यामध्ये गुंडाळलेली होती. काही पाऊच त्यांनी उघडून बघितले तेव्हा असे दिसून आले की हे फाॅर्म गोंदीया जिल्ह्यातील आहे. मतदार अगोदरच हि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी धावपळ करत आहे. मतदारांपर्यंत हे फाॅर्म पोहोचले किंवा नाही अथवा जे फाॅर्म मतदारांकडे राहणार ते तर नाही ना...? यामध्ये बीएलओची चूक तर नाही...? ज्या मतदारांचे फाॅर्म हे आहे त्यांनी फाॅर्म भरले का...अथवा नाही...? असे अनेक प्रश्न यावरून उपस्थित होत आहे. गिफ्ट पाऊच बनवण्यासाठी हे फाॅर्म कसे पोहोचले...? पश्चिम बंगाल सारखी परिस्थिती करण्यासाठी तर नाही ना हे षडयंत्र होत आहे असा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची एमआयएमचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. जाणूनबुजून मतदार वगळण्यासाठी तर नाही हे षडयंत्र केले जात आहे असा आरोपहि करत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.
नगरसेवक मोहम्मद असरार यांच्याशी डि-24 न्यूजने संपर्क केला असता त्यांनी सांगितले इम्तियाज जलिल यांच्या आदेशाने मी त्या किराणा दुकानात गेलो असता गिफ्ट पाऊच S I R फाॅर्म मध्ये आढळून आले. 10 ते 20 पाऊच उघडले त्यामध्ये गोंदीया जिल्ह्यातील अर्जून मोरगावचे हे फाॅर्म होते. असे किती गिफ्ट पाऊच विक्री झाले असतील या प्रकरणी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांची सोमवारी भेट घेऊन माहिती देणार आहे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी एमआयएम करणार आहे.
What's Your Reaction?