सोमवारी भरणारे आठवडी बाजार बंद राहणार
 
                                सोमवारी (दि.१३) भरणारे आठवडी बाजार बंद
औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात सोमवार दि.१३ रोजी मतदान होणार आहे. प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे यासाठी सोमवार दि.१३ रोजी भरणारे आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. सोमवारी बंद असणारे बाजार अन्य दिवशी भरविण्यास हरकत नसल्याचेही आदेशात स्पष्ट केले आहे. या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ.मुकेश बारहाते यांनी केले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            