विशालगडच्या घटनेवर गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी
कोल्हापुर, विशालगड गाजापुर येथील हिंसाचार झाल्याबददल महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दयावा असे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष शेख युसूफ यांची मागणी
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.16(डि-24 न्यूज) कोल्हापुर जिल्हयातील विशालगड जवळील गजापुर गावात धार्मिक स्थळाची तोडफोड करुन धर्मग्रंथाला फाडले. अल्पसंख्याक समाजाच्या घरांवर दगडफेक करुन घरे जाळण्याचा प्रयन्त केला. ७० मोटार साईकली व २५ ते ३० चार चाकी वाहने जाळण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्पेशल फेल झाले आहेत. गृहमंत्री यांचे पोलीसांवर काहीएक नियंत्रण राहिलेले नाही. कोल्हापुर सह महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. पुण्यामध्ये हिट अॅन्ड रन्स चा गंभीर प्रकार, मुंबई आणि पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत, मुलींवर होणारे अत्याचार व अन्याय दिवसेंंदिवस वाढलेले आहे. यामध्ये ताजी घटना कोल्हापुर विशालग गाजापुर येथील घटना झालेला हिंसाचारामध्ये पोलीसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याऐवजी पोलीसांनी बघण्याची भुमिका घेतली म्हणुन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दयावा. जे कोणी दोषी असेल त्यांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले व स्थानिक नागरीकांना संरक्षण देण्यात यावे.असे मांगण्याचे निवेदन विभागीय आयुक्त यांना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ.जितेंद्र देहाडे, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष इब्राहीम पठाण, अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सचिव नासेर नजीर खान, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे काँगेस चे उपाध्यक्ष गुलाब पटेल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनिस पटेल, डॉ.अरुण शिरसाठ, मोईन इनामदार आकेफ रजवी, डॉ.निलेश अंबेवाडीकर, इंजि.शेख इफतेखार, रेखा राऊत, आसमत खान, शफिक शहा, अब्बास पठाण, सबीया शेख, ज्ञानेश्वर ढेपे, योगेश बहादुरे, सचिन फुलारे, रंजनाताई साळवे, मजाज खान मज्जित पटेल बाळू गायकवाड आदी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?