एमआयएम अवसरवादी पार्टी, मुस्लिमांना सोबत घेणार पण त्यांना नाही - बाळासाहेब आंबेडकर

 0
एमआयएम अवसरवादी पार्टी, मुस्लिमांना सोबत घेणार पण त्यांना नाही - बाळासाहेब आंबेडकर

वंचित 25 जूलै ते 8 ऑगस्ट पर्यंत काढणार आरक्षण बचाओ यात्रा...

एमआयएम अवसरवादी पार्टी, मुस्लिमांना सोबत घेणार पण त्यांना नाही - बाळासाहेब आंबेडकर, अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावे तरच आघाडीसाठी चर्चा करणार असल्याची पत्रकार परिषदेत आंबेडकरांची माहिती...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.16(डि-24 न्यूज) एमआयएम अवसरवादी पार्टी आहे. त्यांनी आमचा वापर केला नंतर ओबीसींची सत्ता येणार तेव्हा शंभर जागा मागून युती तोडली म्हणून आमच्या सोबत असलेला ओबीसी समाज नाराज आहे त्यांचे म्हणणे आहे मुस्लिम समाजाला सोबत घ्यावे परंतु एमआयएमला सोबत घेऊ नये म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत युती होण्याचा प्रश्नच नाही. अजित पवार गट आमचा वापर करत आहे. अजित पवार यांनी सत्ता सोडावी त्यांचे राजकारण रिइस्टॅब्लिश करतो. सत्तेतून ते बाहेर पडल्यानंतर चर्चा करु. महायुतीतून पवारांनी बाहेर पडावे आम्ही मैत्री करु. अशी ऑफर दिली. आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार आहे. असे आघाडीच्या प्रश्नावर वंचितचे सर्वैसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले सध्या राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणावरून परिस्थिती विस्फोटक बणली आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी राज्यात वातावरण शांत करण्यासाठी 25 जूलै पासून 8 ऑगस्ट पर्यंत एससी एसटी ओबीसी आरक्षण बचाओ यात्रा काढणार आहे. आरक्षण बचाओ यात्रेची सुरुवात दादरच्या चैत्यभूमीवरुन 25 जूलै रोजी करणार आहे. तेथून पुणे फुलेवाडा येथे जाणार आहे. 26 जूलै रोजी राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर येथे आरक्षणाची घोषणा केली होती तेथे त्यांना अभिवादन करून यात्रेला सुरुवात करणार आहे. यात्रेचा समारोप औरंगाबाद येथे 7-8 ऑगस्ट रोजी करण्यात येईल अशी घोषणा पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी केली आहे.

यात्रेत मागणी आहे ओबीसींचे आरक्षण वाचले पाहिजे. एससी एसटी विद्यार्थ्यांची स्काॅलर्शिप दुप्पट करावी. केंद्राची स्काॅलर्शिप मिळते इतर राज्यांप्रमाणे राज्याचाही हिस्सा असायला हवा. एससी एसटी स्काॅलर्शिप प्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना स्काॅलर्शिप मिळावी. घाई गडबडीत देण्यात आलेले फाॅर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट रद्द करावे. जे कुणबी आहे त्यांना आरक्षण मिळणारच आहे. कारण ते ओबीसीत आहे. एससी एसटी प्रमाणे ओबीसींना पदोन्नती मिळावी या मागणीसाठी हि यात्रा काढण्यात येणार आहे. नवीन कुणबी प्रमाणपत्र तपासले गेले नाही. ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांनी अर्ज केलेला नाही. तुम्ही स्वतःहून सर्च केले आहे. ज्यांनी घेतले नाही त्यांनी सोडून दिले आहे असे होऊ शकते. नव्याने दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे अशी मागणी आंबेडकरांनी यावेळी केली आहे. आरक्षण बचाओ यात्रा कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, जालना येथे जाईल. मुक्कामाच्या ठिकाणी काॅर्नर मिटींग व जाहीर सभा घेण्यात येईल.

आंबेडकर म्हणाले ओबीसींचे काही नेते व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केली तुम्ही ओबीसींचा लढा हातात घ्यावा म्हणून या विनंतीला मान देऊन आरक्षण बचाओ यात्रा काढत आहे. आजची जी परिस्थिती राज्यात निर्माण झाली ती भयानक आहे. ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद काही श्रीमंत मराठ्यांनी लावला आहे. याची भीती ओबीसींना वाटत आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, काँग्रेस व शिवसेना(उबाठा) कुणीच उपस्थित नव्हते. या बैठकीत काय भुमिका घ्यावी हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. जोपर्यंत श्रीमंत मराठे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा, आपली भूमिका मांडत नाही तोपर्यंत या प्रश्नावर तोडगा निघणार नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपल्या भुमिका समोर ठेवावी.

विशालगडाच्या घटनेवर आंबेडकर म्हणाले शाहु महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे विशालगड वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर शासनाने कारवाई करावी. या घटनेच्या मागे संभाजी भिडे गुरुजी असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. मुस्लिम समाजाने शांतता ठेवावी. जे लोक तेथे राहतात ते 1990 दशकाच्या अगोदर पासून राहतात. त्यांचे पुनर्वसनासाठी शासनाने कारवाई करावी त्यानंतर अतिक्रमण काढावे अशी मागणी त्यांनी केली.

 अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, अफसरखान, जावेद कुरैशी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow