हनुमान नगर येथील कर थकबाकी पोटी 3 मालमत्ता सील
हनुमान नगर येथील कर थकबाकी पोटी 3 मालमत्ता सील
औरंगाबाद, दि.24(डि-24 न्यूज) आज वार्ड क्र. 94 गारखेडा - हनुमान नगर येथील श्रीमती एल डी जाधव ( F0058951) यांच्याकडे RS = 1,20,551/- रुपये मालमत्ता कर थकबाकी असल्याने, श्रीमती आसराबाई दाभाडे ( F0069604) यांच्याकडे RS = 73,120/- रुपये आणि श्रीमती नंदा नलावडे ( F0070869) यांच्याकडे RS = 1,18,752/- रुपये मालमत्ता कर थकबाकी असल्याने वर नमूद तिन्ही मालमत्ता सील करण्यात आली.
सदरील कारवाई कर निर्धारक व संकलक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक 7 प्रसाद देशपांडे , कार्यालय अधिक्षक विलास भणगे आणी वरिष्ठ कर निरिक्षक दत्तात्रय केनेकर यांनी पार पाडली. कारवाई वेळी पथकप्रमुख अजय लोखंडे ,पवन आडे आदी हजर होते.
What's Your Reaction?