शहर पोलिस व ग्रामीण पोलीस दलास दोनशे बॅरिकेड्स भेट, आयुक्तांनी मानले आभार

ह्योसंग इंडिया कंपनीकडून पोलिसांना 200 बॅरिकेड्स भेट...
पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी मानले आभार...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12 (डि-24 न्यूज) - वाढते शहर व वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून वाहतूक शाखा कार्यरत आहे. मात्र, कधीकर्धी गर्दी अटोक्यात आणण्यासाठी व वाहतूकीची जनजागृती होण्यासाठी बॅरिकेड्सची मदत होती. ही जनभावना लक्षात घेत सामाजिक दायित्वाद्वारे (सीएसआर) ह्योसंग इंडिया प्रा. ली. कंपनीने शहर पोलीस दलाला दोनशे बॅरिकेड्स उपलब्ध करून दिले. यावेळी पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी कंपनीचे आभार मानले. सीएसआय अंतर्गत, कंपनीने शंभर बॅरिकेड्स पोलीस आयुक्त कार्यालयास आणि शंभर बॅरिकेड्स पोलीस अधीक्षक कार्यालयास सुपूर्द केले.
ह्योसिंग कंपनीने आपल्या ‘रोड सेफ्टी विथ हयोसंग’ या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटा उपक्रमाअंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 200 बॅरिकेड्सची देणगी म्हणून प्रदान केली. शेंद्रा डीएमआयसीमध्ये दक्षिण कोरियाची कापड उद्योग करणारी या कंपनी 14 मार्च 2018 रोजी स्थापन करण्यात आली.
या प्रसंगी पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी ह्योसंग इंडियाचे आभार मानले. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने, वाहतूक नियंत्रणाकरिता तसेच वेळोवेळी बंदोबस्ताकरिता आवश्यक असणारे बॅरीकेट्स दिल्याने पोलीस दलाला मोठी मदत होणार आहे. उद्योग वाढीसाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन म्हणून आम्ही सदैव तत्पर आहे व राहील अशी मी ग्वाही मी आपणास देतो. आपण केलेल्या सहकार्याबद्दल ऋणी असल्याचे पवार म्हणाले. याप्रसंगी उपायुक्त शिलवंत नांदेडकर, सहाय्यक पोलिस आयुक्त धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक डॉ. विवेक जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री सुनील कराळे आदीसह सहकारी उपस्थित होते. ह्योसंग कंपनीकडून एचआर जनरल मॅनेजर राजर्षी गौतम, वरिष्ठ व्यवस्थापक (मेंटनन्स) अमोल गुप्ता, एचआर उपव्यवस्थापक मदन वाघुंडे आदी व्यवस्थित होते.
What's Your Reaction?






