श्रीगणेश महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे थाटात उद्घाटन...!
चांगला पाऊस पडू दे..!, बळीराजा सुखावू दे..!
आमदार विलास भुमरेंचे गणरायाला साकडे
श्री गणेश महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे थाटात उदघाटन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)- मराठवाड्यात पावसाभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हाताशी आलेल्या पिकांचे पाण्याभावी नुकसान झाल्याने शेतकरी राजावर संकट आल्याने श्री क्षेत्र पैठण विधानसभा मतदार संघांचे आमदार विलास भुमरे यांनी राज्यात चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखावू दे अशी श्री गणरायाला प्रार्थना करत साकडे रविवारी (दि. 13) घातले. निराला बाजार येथील जिल्हा श्री गणेश महासंघाच्या कार्यालयाचे थाटात भुमरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा श्री गणेश महासंघाचे संस्थापाक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, खासदार डॉ. कल्याण काळे, माजी खासदार इम्तियाज जलील, महापौर समीर राजूरकर, मनपा स्थायी समिती सभापती अनिल मकरीये, पोलिस आयुक्त प्रविण पवार, मनपा आयुक्त अमोल येडगे, मनपा उपायुक्त नंदकिशोर भोंबे, क्रांती चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी तावडे, यांची उपस्थिती होती. उपस्थित सर्व मान्यवरांचे यावेळी श्री गणेश महासंघ उत्सव समिती अध्यक्ष हरिभाऊ हिवाळे यांनी स्वागत केले. पोलिस आयुक्त प्रविण पवार म्हणाले की, आपल्या शहरातील गणेशोत्सव हा शांततेत होण्यासाठी सर्व गणेशभक्तांनी डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा. पारंपरिक वाद्य, ढोल, ताशाला प्राधान्य देऊन आपण हा गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले. तर मनपा आयुक्त अमोल येडगे म्हणाले की, सार्वजनिक गणेश मंडळासाठी छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने " माझा बाप्पा, स्वच्छतेचा राजा" ही अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेमध्ये सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आपले शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी संकल्प करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्याध्यक्ष डॉ. बाळासाहेब थोरात, राजू बागडे, कृष्णा बनकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण डोणगावकर, संतोष जेजुरकर, मिल्लू चावरिया, किशोर तुळशीबागवाले, सुरेश टाक, विजय सुबूकुडे, माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप, राहुल सावंत, पप्पू ठुबे, सुनील कोटकर, नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल,
मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जोशी, यांची उपस्थिती होती. तर कार्याध्यक्ष अनिकेत निल्लावार, विशाल दाभाडे, संदिप शेळके, हरीश शिंदे, दिनेश राजेभोसले, निनाद खोचे, प्रमोद ठेंगडे, नंदू लबडे, शिवाजी जोगदंड, समाधान पाटील, प्रल्हाद घुगे, समाधान पाटील, बंटी चौधरी, सागर निकम, चंदू हिवाळे, ऋषिकेश हिवाळे, अभिषेक हिवाळे,मनोज मगरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे यांनी केले.
उद्या श्री गणेश महासंघाच्या "श्री"ची प्रतिष्ठापणा
निराला बाजार येथील श्री गणेश महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात "श्री" ची प्रतिष्ठापणा सकाळी 11 वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या सोहळ्या सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री गणेश महासंघाचे अध्यक्ष हरिभाऊ हिवाळे यांनी केले आहे.
What's Your Reaction?