स्व.जेष्ठ पत्रकार अब्दुल कय्यूम यांच्या निवासस्थानी इम्तियाज जलील यांची सांत्वनपर भेट...
स्व. ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कय्यूम यांच्या निवासस्थानी इम्तियाज जलील यांची सांत्वनपर भेट
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 5 (डि-24 न्यूज) : साप्ताहिक औरंगाबाद युवाचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कय्यूम अब्दुल रशीद यांचे रविवारी दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
अब्दुल कय्यूम यांच्या निधनानंतर आज सायंकाळी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी भडकलगेट येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी अब्दुल कय्यूम यांच्या आई, भाऊ, मुलगा तसेच कुटुंबातील अन्य सदस्यांशी संवाद साधत त्यांचे दुःख जाणून घेतले.
अब्दुल कय्यूम यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असून, सदैव कुटुंबाच्या पाठीशी राहू, असा विश्वास इम्तियाज जलील यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच स्व. अब्दुल कय्यूम यांच्या आत्म्यास शांती लाभावी आणि अल्लाह तआला त्यांची मगफिरत फरमावो, यासाठी त्यांनी दुवा केली.
याप्रसंगी अब्दुल कय्यूम यांचे भाऊ अयूब शेख, सलीम शेख, मुलगा अब्दुल मुजाहेद, तसेच हाफिज अली, अजहरोद्दीन, अनिस रामपुरे, अल्ताफ हुसेन आदी उपस्थित हो
ते.
What's Your Reaction?