अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्टीचा निर्णय घेतल्याने कृती समितीने मानले आभार
अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्टीचा निर्णय घेतल्याने कृती समितीने मानले आभार
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.9(डि-24 न्यूज) राज्य सरकारने मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट संस्था अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कॅबिनेटमध्ये मंजुरी दिल्याने मार्टी कृती समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व विविध पक्षातील आमदार व नेत्यांनी या चार वर्षांच्या संघर्षात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष साथ दिली. माध्यमांचाही या मागणीसाठी भरपूर मदत झाली याबद्दल मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टी कृती समीतीचे अध्यक्ष अॅड अजहर पठाण व सदस्यांनी पत्रकार परिषदेत आभार मानले. या निर्णयाचे स्वागत केले व अंमलबजावणी लवकर करावी जेणेकरून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लवकर फायदा होईल.
मार्टी कृती समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष अॅड अजहर पठाण यांनी सांगितले की या सरकारी स्वायत्त संस्थेच्या स्थापनेमुळे राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण कौशल्य क्षमतांना प्रगती करण्यासाठी लागणा-या आर्थिक अडचणीतवर मात करता येईल. त्यामुळे राज्यातील विकासात आणि समृध्दीत त्याचा महत्वाचा हिस्सा असेल. बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत आर्टी, तर्टीच्या धर्तीवर सर्व योजनांचा लाभ समान संधी मुस्लिम अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मार्टीच्या वतीने मिळेल. ग्रामीण भागातील कार्यरत तरुणांचा सर्वांगीण प्रशिक्षणापासून ते शहरी भागातील पीएचडी करणा-या विद्यार्थ्यांपर्यंत सुविधा, मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य प्रदान करेल. या संस्थेच्या अंतर्गत सुमारे तीनशे पेक्षा जास्त आयटीआय कोर्स, पोलिस प्रशिक्षण, पायलट प्रशिक्षण, विविध स्पर्धात्मक परीक्षांची तयारी, एमपिएससी, युपीएससी, बँकींग, कौशल्य विकास आणि इतर संस्थांच्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी यामध्ये महत्वपूर्ण मार्गदर्शन, शिक्षण आणि आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल. शैक्षणिक संस्था, ट्रस्ट, सामाजिक कार्यकर्त्यांना या दिर्घकालिक सुविधा संदर्भात माहिती प्राप्त करून विद्यार्थ्यांना आणि तरुणांना मार्गदर्शन करण्याची विनंती सरकारकडे केली आहे.
याप्रसंगी सर आसेफ, अॅड वसीम कुरेशी, बुलढाणा, शाबाज पठाण, मुंबई, नबीलउज्जमा, बीड, सेवानिवृत्त आयटीआयचे प्राचार्य शेख सलीम, डॉ.अफसर शेख, जाहिद अलकसेरी, इम्रान बाशवान आदी उपस्थित होते.
MARTI English News...
MARTI Kruti Samiri thanks CM,Dy CMs among others for approval given by State government
Chhatrapati Sambhajinagar(Aurangabad)Aug 9 Maulana Azad Research Training Institute (MARTI )Kruti Samiti President Adv Azhar Pathan and members on Friday thanked to Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Ajit Pawar, Deputy Chief Minister Devendra Fadnavis ,Minister of Minority Development and District Guardian Minister and MLAs for getting approval to MARTI to provide higher education facilities to minority students.
Adv Azhar Pathan and members also thanked different party leaders and media for their help in this demand. This decision is welcomed and should be implemented soon so that the students who are studying can benefit from it soon.
Adv Pathan, Maharashtra President of MARTI Action Committee, said that the establishment of this government autonomous body would help the minority students of the state to overcome financial constraints to advance their academic skills.
Therefore, it will play an important role in the development and prosperity of the state.
All schemes on the lines of Barti, Sarathi, Mahajyoti, Amrut Arti, Terti will provide equal opportunity to Muslim minority students on behalf of Marti. It will provide facilities, guidance and financial assistance ranging from holistic training of working youth in rural areas to PhD students in urban areas. Under this institute, more than three hundred ITI courses, police training, pilot training, preparation for various competitive exams, preparation for MPSC, UPSC, banking, skill development and other institutes will provide important guidance, education and financial assistance. Educational institutions, trusts, social workers have been requested to the government to get information regarding this long-term facility and guide the students and youth,he added.
What's Your Reaction?