अखेर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारला राजीनामा...!

अखेर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारला राजीनामा...!
मुंबई, दि.4(डि-24 न्यूज) मसाजोगचे सरपंच हत्या प्रकरणी अखेर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पुढील कारवाई साठी हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे. मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर माझ्या सदसद्विवेकबुद्धीला स्वरुन आणि वैद्यकीय कारणांमुळे मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला असे एका ट्विटरद्वारे स्पष्ट केले आहे.
धनंजय मुंडे वंजारी समाजाचा मोठा चेहरा आहे. वाल्मिक कराडला दिलेली मोकळीक त्यांना भोवली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांच्या वतीने येत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे ते अडचणीत सापडले. विरोधकांनी सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली तर समाजसेविका अंजली दमानिया यांनी त्यांचे अनेक प्रकरणे समोर आणली. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशलमिडीयावर व्हायरल झाल्याने यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ झाला. यामुळे सरकारवरील दबाव वाढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. अखेर आज धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
What's Your Reaction?






