शिवजयंती मिरवणुकीत लाॅरेन्स बिश्नोईचा फोटो झळकल्याने खळबळ, पोलिसांनी युवकाला केली अटक...!

 0
शिवजयंती मिरवणुकीत लाॅरेन्स बिश्नोईचा फोटो झळकल्याने खळबळ, पोलिसांनी युवकाला केली अटक...!

शिवजयंती मिरवणुकीत लाॅरेन्स बिश्नोईचा फोटो झळकल्याने खळबळ, पोलिसांनी युवकाला केली अटक...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) 19 फेब्रुवारी 2025

रोजी राज्यासह देशभरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात शिवजयंती मिरवणुकीत लाॅरेन्स बिश्नोईचा फोटो झळकल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका युवकाला शहर पोलिसांनी अटक केली आहे. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये मिरवणुकीदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवजयंतीच्या मिरवणुकीत लॉरेन्स बिष्णोईचे पोस्टर मिरवणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

बुधवारी क्रांती चौकात शिवजयंतीच्या मिरवणुकीत एका तरुणाने लॉरेन्स बिष्णोईचे फोटो असलेले बॅनर झळकावले होते. बिष्णोईचे बॅनर झळकावल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. बिष्णोईचे बॅनर झळकावणाऱ्याचं नाव विशाल श्याम पवार (साळुंखे) असे आहे. विशाल पवार हा 21 वर्षांचा आहे. बिष्णोईचे बॅनर झळकावल्या प्रकरणी विशालला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या पथकाकडून तरुणाला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या विशाल श्याम पवार (साळुंखे) याचे बिष्णोई गँगशी संबंध आहेत का...? तसेच बिष्णोई गँग संभाजीनगरमध्ये हात-पाय पसरवत आहे का...? याचा तपासही शहर पोलीस करत आहेत.

बिष्णोई गँगचे सदस्य महाराष्ट्रात

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी बिष्णोई गँग चर्चेत आली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतही बिष्णोई गँगचा एँगल समोर आला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये बिष्णोई गँगचे महाराष्ट्रातले सदस्य असल्याचेही तपासात समोर आले. सलमान खानशी असलेली बाबा सिद्दिकी यांची जवळीक किंवा SRA प्रकल्पाचा वाद, यातून बिष्णोई गँगकडून बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.

आता शिवजयंतीच्या मिरवणुकीतही लॉरेन्स बिष्णोईचे फोटो झळकल्यामुळे तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आणि त्यांनी एका दिवसाच्या आत पोस्टर झळकवणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. लॉरेन्स बिष्णोई हा सध्या गुजरातच्या साबरमती जेलमध्ये अटकेत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow