अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तैनात केली 39 पथके, रेतीची अवैध वाहतूक रोखणार

गौण खनिजःअवैध उत्खनन व वाहतूक रोखणार स्थिर पथके;
39 ठिकाणी पथके तैनात करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.10(जिमाका):-जिल्ह्यात गौण खनिजाची होत असलेले अवैध उत्खनन व वाहतुक रोखण्यासाठी स्थिर पथके व चेक पोस्ट तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले असून गौण खनिज उत्खनन होण्याच्या शक्यता असलेल्या जागांच्या मार्गांवर हे पथके तैनात करण्यात यावेत असे स्पष्ट केले असून जिल्ह्यात 39 ठिकाणी हे पथके तैनात करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके यांनी दिली आहे.
जिल्ह्यात दि.1 एप्रिल 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत एकूण 208 अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणामध्ये कारवाई 3 कोटी 91 लाख 82 हजार रुपये इतका दंड आकारण्यात आला असून 2 कोटी 41 लाख 16 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवायांमध्ये 27 गुन्हे दाखल करण्यात आले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 199 वाहने व 4 यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अवैधरीत्या होत असलेले गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी कारवाई करण्यासाठी सर्व तालुक्यात विविध ठिकाणी गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी स्थिर पथकांची स्थापना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये अवैध गौण खनिज व वाहतुक करणाऱ्या वाहनांवार कारवाई करण्याकामी तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणी स्थिर पथके, चेक नाके तयार करण्यासाठी त्या त्या तालुक्यातील ठिकाणे कळविण्यातबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तहसिलदार कार्यालयाच्या अखत्यारीतील स्थिरपथके तपासणी नाके याप्रमाणे-
अपर तहसिल कार्यालय, छत्रपती संभाजीनगर – नगर नाका, छावणी , वाल्मी नाका पैठण रोड
तहसिल कार्यालय (ग्रामीण ) – कँब्रीज शाळा चौफुली, जालना रोड, चिकलठाणा, सावंगी टी पाँईट, जळगाव रोड सावंगी, पिसादेवी पळशी चौफुली, सावंगी – कँब्रीज शाळा बायपास रोड, पिसादेवी , करमाड राजा प्रिंप्री टी – पाँईट, करमाड पोलीस स्टेशन जवळ, करमाड, झाल्टा फाटा टी पाँईट, बीड बायपास रोड झाल्टा
तहसिल कार्यालय पैठण – पैठण शेवगाव रोडवर बलदवा माळा, मौजे – पैठण हद्द, पैठण- छत्रपती संभाजीनगर रोडवर, हॉटेल सह्याद्री चौक, आपेगाव रोड कमान, शेवगाव रोड, नाथ मंदिराच्या पाठीमागे गोदावरी नदी, मौजे – चनकवाडी, मौजे – पाटेगाव
तहसिल कार्यालय फुलंब्री - पाल फाटा- किनगाव फाटा
तहसिल कार्यालय वैजापूर – पुरणगाव, सावखेडगाव, नागमठाण, झालेगाव, लाखणी, लासुरगाव
तहसिल कार्यालय गंगापूर – जामगांव, वाहेगाव, आसेगाव, लिंबेजळगाव टोल नाकाृ
तहसिल कार्यालय कन्नड – नेवपूर, देवळी
तहसिल कार्यालय खुलताबाद- खुलताबाद – फुलंब्री रोड वरील काटशेवरी फाटा, धुळे-सोलापूर हायवे वरील वेरुळ या ठिकाणी
तहसिल कार्यालय सिल्लोड – भराडी पेट्रोल पंप नाका सिल्लोड, डॉ.बाबासाहेब आँबेडकर चौक, संभाजीनगर नाका सिल्लोड, भोकरदन फाटा, कोटनांद्रा बोरगाव बाजार, पिरोळा फाटा, सिसारखेडा भराडी, पंप धानोरा फाटा, वांजोळा फाटा, केऱ्हाळा फाटा, निल्लोड फाटा, भवन व चिचंखेडा, बनकिन्होळा, कायगाव, तांडा, बाजार, गव्हाली तांडा, बोरगाव, कासारी, डोंगरगाव, मंगरुळ अन्वी, 12 नंबर फाटा पालोद,गोळेगाव बु शिवणा, अंजिठा, अंभई हट्टी उंडणगाव
तहसिल कार्यालय पैठण – वाळूघाट हिरडपुरी
जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांना त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व वेळोवेळी पोलीस विभागाच्या मदतीने नेमून दिलेल्या ठिकाणी गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणारी वाहने आढळल्यास महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम -1966 चे कलम 48(7) (8) गौणखनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याकरीता करावयाचे उपाय योजना बाबतचे दि.14 जून 2017 च्या शासन निर्णयानुसार सुधारीत वाळू निर्गती धोरण दि.16 फेब्रुवारी 2024 नुसार दंडात्मक कारवाई करावी. तसेच तहसीलदार यांचेशी संपर्क करुन वाहन कार्यालयात जमा करावे,असे निर्देश देण्यात आले आहेत. या कारवाईचा अहवाल दररोज जिल्हाधिकारी कार्यालयात मागविण्यात येणार आहे.
जिल्हृयात होणारी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी कर्तव्या बजावून केलेल्या दैनंदिन कार्यवाहीच्या अहवाल नियमितपणे जिल्हाधिकारी कार्यालय ई-मेलद्वारे करण्यातबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
What's Your Reaction?






