ज्येष्ठ पत्रकार सं. सो. खंडाळकर यांचे पुत्र जिदनेश यांचे पुण्याजवळ निधन ...!

 0
ज्येष्ठ पत्रकार सं. सो. खंडाळकर यांचे पुत्र जिदनेश यांचे पुण्याजवळ निधन ...!

ज्येष्ठ पत्रकार सं. सो. खंडाळकर यांचे पुत्र जिदनेश यांचे पुण्याजवळ निधन

राजगड येथे ट्रेकिंगसाठी गेले असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 11 (डी-24 न्यूज) : ज्येष्ठ पत्रकार सं. सो. खंडाळकर यांचे पुत्र जिदनेश खंडाळकर (वय 35) यांचे पुण्याजवळील राजगड येथे दुर्दैवी निधन झाले. ट्रेकिंगसाठी गेले असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे खंडाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जिदनेश यांनी अॅनिमेशनचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. ते पुण्यातील एका अॅनिमेशन कंपनीत नोकरीला होते. गेल्याच वर्षी त्यांचा विवाह झाला होता. सं. सो. खंडाळकर यांना एक मुलगी आणि एक मुलगा असून, मुलाच्या निधनाने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

या घटनेनंतर पुण्यात पंचनामा आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. जिदनेश यांच्यावर अंत्यसंस्कार छत्रपती संभाजीनगर येथे 6  सायंकाळी होणार आहे. त्यांची अंतिम यात्रा त्यांच्या निवासस्थानातून निघणार आहे.  अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

डी-24 न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

ज्येष्ठ पत्रकार सं. सो. खंडाळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात डी-24 न्यूज परिवार सहभागी आहे. या कठीण प्रसंगी खंडाळकर कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow