प्राध्यापक, शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले - आमदार सतीश चव्हाण

 0
प्राध्यापक, शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले - आमदार सतीश चव्हाण

प्राध्यापक, शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले- आमदार सतीश चव्हाण

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)- मागील तीन 'टर्म' पासून प्राध्यापक शिक्षकांचे प्रश्न वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आणून देते प्राधान्याने सोडवले असे मत आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केले.

मराठवाडा पदवीधर मतदार संघाची निवडणूक 23 ऑक्टोबर रोजी होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना महायुतीचा अधिकृत उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत कार्यरत व्यवस्थापन परिषद सदस्य, सिनेट सदस्य, संस्थाचालक, प्राध्यापकांची संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस उपस्थित राहून आमदार सतीश चव्हाण यांनी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. पुढे बोलतांना आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, मराठवाड्यातील तरुणांना नौकरी मिळाली पाहिजे हे माझे पहिलं उद्दिष्ट आहे. मराठवाड्यातील प्रत्येक विद्यार्थी इथेच शिकला पाहिजे, इथेच घडला पाहिजे, आणि इथेच नोकरीलाही लागला पाहिजे. मराठवाड्यातील विद्यापीठे सक्षम करणे गरजेचे असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊनच आपल्याला हे करता येईल असे मत महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी व्यक्त करत आपला संकल्प बोलून दाखवला. मराठवाड्यात चांगले उद्योग, इन्फ्रास्ट्रॅक्चर, उच्च आणि गुणवत्ता पूर्वक शिक्षण, कृषी अभ्यासक्रम, तंत्रशिक्षण, अभियांत्रिकी क्षेत्रात मीं प्रधान्याने आगामी काळात काम करणार असल्याचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

याप्रसंगी डॉ.शिवाजी मदन, प्रा.सुनील मगरे, अॅड.सुभाष राऊत, विजय राऊत, सुहास मोराळे, विक्रम खिल्लारे, गणी पटेल, ज्ञानेश्वर कोळकर, डॉ..राजेश करपे.दत्ता भांगे, डॉ.दिलीप अर्जुने, डॉ.मुंजाबा धोंडगे, डॉ.अंकुश कदम, प्रा.बंडू सोमवंशी, डॉ.भास्कर साठे, बाबा सालमपुरे, बारी सर, पूनम पाटील, संतोष लोमटे आदींची उपस्थिती होती..  

आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ अमोल कर्डिले यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संवाद मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी उपस्थित राहून आमदार सतीश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी विनोद पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow