शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन, अंबादास दानवे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे निराला बाजारात रास्ता रोको आंदोलन...
अंबादास दानवे यांना ताब्यात घेताना शिवसैनिक-पोलिसांमध्ये झटापट
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ), दि.12(डि-24 न्यूज)- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निराला बाजार येथे सोमवार, 12 ऑक्टोंबर रोजी जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हाताला काळ्या फिती बांधून आणि हातात तिरंगा घेऊन शिवसैनिकांनी लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी निषेध व्यक्त केला.
यावेळी शिवसेना नेते, आमदार तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि शिवसैनिकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली. अखेर पोलिसांनी अंबादास दानवे यांना ताब्यात घेऊन क्रांती चौक पोलीस ठाण्यात नेले. तेथे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
या आंदोलनादरम्यान ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘केंद्र सरकार हाय हाय’ आणि ‘व्होट चोर, गद्दी छोड’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी अंबादास दानवे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आपली भूमिका मांडत केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. लोकशाहीचा आवाज दाबण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, अशी भूमिका अंबादास दानवे यांनी
मांडली.
What's Your Reaction?