वक्फ बोर्ड आले एक्शन मोडमध्ये, अवैध अतिक्रमण काढण्यासाठी चालणार बुलडोझर...!
वक्फ बोर्ड आले एक्शन मोडवर, अवैध अतिक्रमण काढण्यासाठी चालणार बुलडोझर...!
शाळा, महाविद्यालय, हाॅस्पिटल, शिक्षणाच्या उद्देशाने वक्फची जमिन देणार लिजवर... सिटीचौक जमिनीवर कब्जा करणा-यावर होणार गुन्हा दाखल, सिईओ व डिप्टि सिईओ यांना पूर्णवेळ नियुक्तीसाठी घेतला ठराव, 13 हजार नोटीस काढली असल्याने वाढणार उत्पन्न, नोकरभरतीने काम होणार गतिमान, विभागीय कार्यालय मुंबईत सुरू करणार...
औरंगाबाद, दि.(डि-24 न्यूज) वक्फ बोर्डाच्या जमीनीवर अवैध अतिक्रमण करणाऱ्यांची आता खैर नाही. वक्फ बोर्ड एक्शन मोडमध्ये आला आहे. ज्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अवैधप्रकारे अतिक्रमण केलेले आहे संबंधितांवर कायदेशीर गुन्हे दाखल करुन त्या बांधकामांवर बुलडोझर चालणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे चेअरमन तथा आमदार वजाहत मिर्झा यांनी दिला आहे. यामुळे आता भुमाफियांचे धाबे दणाणले आहे.
त्यांनी पुढे सांगितले वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध स्तरांवर चांगले निर्णय घेण्यात आले आहे. सिईओ व डिप्टि सिईओ चांगले काम करत असल्याने राज्यात वक्फ बोर्डाच्या अवैध अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई सुरु झाली आहे. भविष्यात मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याची योजना आखली जात आहे.
बोर्डात 60 जणांची नोकरभरती करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे अधिकारी व कर्मचारी रुजू झाल्यानंतर कामकाज अधिक गतिमान व पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. बोर्डाचे सर्व सदस्य व अधिकारी यांच्या उपस्थितीत मागिल तीन दिवसांपासून विविध प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. 66 प्रकरणात सुनावणी घेत सर्वानुमते निर्णय घेतला आहे. 65 नवीन रजिस्ट्रेशन व 41 योजनेच्या प्रकरणात निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरातील सिटीचौक येथील क्रीम प्राॅपर्टीवर अतिक्रमण झाले असल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सिईओ यांना देण्यात आले आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये व गावातील वक्फ मालमत्तेचे टेंडर काढून शाळा, विद्यालय, महाविद्यालय, हाॅस्पिटल व शैक्षणिक उद्देशासाठी लिजवर जमिन विकासासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड येथील यतीम शहा दर्गाहच्या जमिनीवर अवैधप्रकारे अतिक्रमण झाले होते जिल्हाधिकारी यांनी पोलिस बंदोबस्तात हे अतिक्रमण काढले अशी माहिती पत्रकार परिषदेत वक्फ बोर्डाचे चेअरमन वजाहत मिर्झा यांनी दिली आहे.
खासदार तथा बोर्डाचे सदस्य इम्तियाज जलिल यांनी सांगितले सिईओ मोईन ताशिलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद हे चांगले काम करत असल्याने त्यांना पूर्णवेळ नियुक्ती शासनाने द्यावी यासाठी ठराव घेतला आहे. मुंबई येथे विभागीय कार्यालय सुरू करणे व विविध कामात अडथळे येत असल्याने अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट सर्व सदस्य जाणार आहे. जालना रोड येथील शेकडो कोटींच्या मालमत्तेवर धन्नासेठ यांनी अतिक्रमण केले आहे. न्यायालयात जाऊन संबंधित स्टे आणतात नंतर त्या प्रकरणात कार्यवाही होत नाही व न्यायप्रविष्ट प्रकरणात लिगल पैनल सक्षमपणे हाताळत नाही असे विचारले असता चेअरमन वजाहत मिर्झा यांनी सांगितले आता नवीन लिगल पैनल गठीत करण्यात येणार आहे. ट्रीब्युनलमध्ये निर्णय झाला तरीही वक्फ बोर्डाकडे निरीक्षणासाठी पाठवले जाते. महसूल विभागाचे सहकार्य मिळत नसल्याने एक बैठक विभागीय आयुक्त यांचेसोबत घेतली जाणार आहे असे जलिल म्हणाले. खासदार फौजिया खान यांनी सांगितले समाजाच्या हितासाठी व वक्फ बोर्डाच्या प्रगतीसाठी अनेक निर्णय घेतले जात आहे. अधिकारी सुध्दा चांगले काम करत असल्याने बोर्डाचे उत्पन्न वाढत असल्याने नवीन योजना सुरू केली जातील. चोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. कामात पारदर्शकता आणून वक्फ बोर्डाच्या विकासासाठी सर्व सदस्य प्रयत्न करत आहे. परभणी येथील तुराबूल हक दर्गाहची जमिन आणि उस्मानिया मस्जिद जमिनीवर कायदेशीर बाबी पूर्ण करत विकासकामे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी वक्फ बोर्डाचे सदस्य मौलाना अथर अली, एड मुदस्सीर लांबे, हसनैन शाकीर, समीर काजी, सिईओ मोईन ताशिलदार, डिप्टि सिईओ जूनेद सय्यद उपस्थित होते.
What's Your Reaction?