शेतकऱ्यांच्या मागणीसाठी राष्ट्रवादीने काढला जन आक्रोश मोर्चा
शेतकऱ्यांच्या मागणीसाठी राष्ट्रवादीने काढला जन आक्रोश मोर्चा
औरंगाबाद, दि.31(डि-24 न्यूज) मराठवाडा व जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहे. त्यांना सरकारी मदत मिळत नाही बिमाही मिळत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार आतापर्यंत मिळाले नाही. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादीने युवक जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढला. यावेळी शेकडो शेतकरी सहभागी झाले. शरद पवार गटाचे कार्यकर्ते यावेळी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले. सरकारच्या विरोधात याप्रसंगी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे मागील वर्षीच्या सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळावे, सतत पावसाचा खंड पडल्यामुळे दिला जाणारा 25 टक्के अग्रीम विमा मिळावा. गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील फळबागेचे झालेले नुकसानभरपाई अनुदान मिळावे. यावर्षी विशिष्ट रोगामुळे झालेल्या फळबाग गळतीसाठी शासकीय अनुदान मिळावे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये मिळावे. सक्तीची कर्जवसुली थांबवून विविध शेतक-यांच्या खात्यांना लागलेली स्थगिती उठवणे. संपूर्ण कर्जमाफी करून विना पंचनामा तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी. कांद्यावर लागलेले निर्यातशुल्क रद्द करुन सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा. उपद्रवी प्राण्यांचा बंदोबस्त करावा. विमा कंपनीचे तालूकास्तरीय कार्यालय करुन आवश्यक मणूष्यबळ द्यावा अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आले आहे. यावेळी वसंत झिंजुर्डे, मंगेश लंगडे, भगवान चौधरी, अभय पवार, प्रल्हाद आवरे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?