सिटी चौक ते गुलमंडी, कटकट गेट अतिक्रमण पाहणी, सामान जप्तीची कारवाई होणार...!

 0
सिटी चौक ते गुलमंडी, कटकट गेट अतिक्रमण पाहणी, सामान जप्तीची कारवाई होणार...!

सिटी चौक ते गुलमंडी अतिक्रमण पाहणी...

सोमवार पासून थेट सामान जप्तीची कारवाई

औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) आज आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी शहरातील सिटी चौक ते गुलमंडी पार्किंग पर्यंतचे अतिक्रमण पाहणी केली.

 या रस्त्यावर फुल , अत्तर विक्रेते यांनी छोट्या वाहतुकीचे रोड बंद करून त्या ठिकाणी दुकाने मांडले आहेत.

  आज या ठिकाणी पाहणी करत असताना 3 दुकानदारांवरती प्रती 5 हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. असे एकूण 15000 दंड वसूल करण्यात आला. तसेच या ठिकाणी असलेले इतर अतिक्रमण धारकांनी आपले दुकानांचे अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा सोमवार पासून थेट सामान जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल अशी समज देण्यात आली.

या पाहणी वेळी इमारत निरीक्षक मजहर अली, सागर श्रेष्ठ, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव, अतिक्रमण विभाग व नागरी मित्र पथकाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती. अशाच प्रकारे कटकट गेट ते पोलिस मेस रोड ते पिरगैबसाब रोड पर्यंत मनपाच्या गाडीत माईकने रस्त्यावर उभे वाहने टप-या व अतिक्रमण दोन दिवसात काढून घ्यावे नसता साहित्य व वाहने जप्त करण्यात येईल अशी समज देण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow