डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजने अंतर्गत 32 सदनिकांचे सोडत पद्धतीने वाटप...

 0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजने अंतर्गत 32 सदनिकांचे सोडत पद्धतीने वाटप...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत 32 सदनिकांचे सोडत पद्धतीने वाटप...

महापौर समीर राजूरकर व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडत प्रक्रिया संपन्न...

छत्रपती संभाजीनगर, दि.15(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेच्या घनकचरा विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना राबविण्यात येत असून, या योजनेंतर्गत सफाई कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांच्या वाटपासाठी आज महापौर श्री. समीर राजूरकर व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडत प्रक्रिया पार पडली.

महानगरपालिकेच्या सफाई कामगारांनी 25 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा बजावलेली असल्यास तसेच सेवेत असताना किंवा सेवानिवृत्तीनंतर त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या पात्र वारसास मालकी तत्त्वावर मोफत सदनिका देण्याचा शासन निर्णय आहे. त्यानुसार महानगरपालिकेने ही योजना राबविली आहे. 

या योजनेंतर्गत हर्सूल येथील गट क्रमांक 266 मधील जागेवर दोन इमारतींमध्ये एकूण 32 सदनिका बांधण्यात आल्या आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये चार सदनिकांचे चार मजले असून, प्रत्येक सदनिका 1 बीएचके स्वरूपाची आहे. सदनिकेचे बांधकाम क्षेत्रफळ साधारणतः 30 चौ.मी. आहे. या बांधकामासाठी निविदेतील तरतुदीनुसार काम पूर्ण करण्यात आले असून, संबंधित कामाची प्रशासकीय व आर्थिक माहिती महापालिकेच्या नोंदीनुसार निश्चित करण्यात आली आहे.

सोडत कार्यक्रमास उपमहापौर श्री. राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती श्री. अनिल मकरिये, सभागृह नेते श्री. गोविंद केंद्रे, विरोधी पक्षनेते श्री. अब्दुल समीर साजिद, गलिच्छ वस्ती सुधार समिती सभापती श्री. जालिंदर शेंडगे, गटनेते श्री. हाजी शेरखान, नगरसेवक श्री. बालाजी मुंडे, श्री. फिरोज खान, मनपा आयुक्त श्री. अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त श्री. रणजीत पाटील, उपायुक्त श्रीमती अपर्णा थेटे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित

होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow