दलित पँथरच्या 27 व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय न्याय हक्क मेळाव्याचे आयोजन

 0
दलित पँथरच्या 27 व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय न्याय हक्क मेळाव्याचे आयोजन

दलित पँथरच्या 27 व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय न्याय हक्क मेळाव्याचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 6 (डि-24 न्यूज) - सन 1972 मध्ये स्थापन झालेल्या पँथर चळवळीने महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले असून, दलितांवरील अन्याय-अत्याचाराविरोधात सातत्याने आवाज उठविण्याचे कार्य केले आहे. गेल्या 27 वर्षांपासून ही चळवळ सामाजिक न्यायासाठी कार्यरत असून तिची परंपरा आजही कायम आहे.

भारतीय दलित पँथर चळवळीच्या 27 व्या वर्धापनदिनानिमित्त रविवार, दि. 9 ऑगस्ट 2026 रोजी जळगाव रोडवरील गरवारे कंपनीजवळील महात्मा फुले हॉल येथे राज्यस्तरीय न्याय हक्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून प्रा.ऋषीकेश कांबळे मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाला उदगीरचे नगरसेवक निवृत्ती सांगवे, युवा नेते महेंद्र सोनवणे, वैजापूर पंचायत समिती सभापती एकनाथ त्रिभुवन, प्रा. प्रकाश सोनवणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पँथर नेते लक्ष्मणदादा भुतकर राहणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. 

या मेळाव्यात नामवंत कलाकार, पत्रकार, सफाई कर्मचारी तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष धर्मपाल दांडगे, राजकुमार कांबळे, दसरथ कांबळे, ॲड. सिद्धार्थ गवई, संजय सरवदे, शरीफ पठाण, अहमद पठाण, सय्यद हबीब, डॉ.सुखदेव कांबळे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow