नदीम पटेल यांची वर्ल्ड पीस हार्मोनी च्या महाराष्ट्र प्रभारी पदी निवड
नदीम पटेल यांची 'वर्ल्ड पीस हार्मोनी' च्या महाराष्ट्र प्रभारी पदी निवड; राष्ट्रीय चेअरमन शकील सैफी यांनी दिले नियुक्ती पत्र
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)- सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले आणि ग्रामीण भागातील खंदे समाजसेवक नदीम पटेल (नदीम हाशमोद्दीन शेख) यांची 'वर्ल्ड पीस हार्मोनी' या संस्थेच्या महाराष्ट्र प्रभारी (Incharge of Maharashtra) पदी नियुक्ती करण्यात आहे. संस्थेचे राष्ट्रीय चेअरमन डॉ. शकील सैफी यांनी त्यांना अधिकृत नियुक्ती पत्र देऊन या पदाची जबाबदारी सोपवली आहे.
नदीम पटेल हे ग्रामीण भागामध्ये विविध सामाजिक उपक्रम, गरिबांना मदत आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या या उल्लेखनीय समाजकार्याची दखल घेऊनच त्यांची या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या महाराष्ट्र प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल संस्थेचे राष्ट्रीय चेअरमन डॉ. शकील सैफी यांनी विश्वास व्यक्त केला की, नदीम पटेल हे महाराष्ट्रात संस्थेचे ध्येय-धोरण पुढे नेतील आणि देशात तसेच राज्यात शांतता, बंधुभाव व राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी आपले मोलाचे योगदान देतील. या नियुक्ती पत्रावर संस्थेचे पेट्रन (Patron) तथा खासदार प्रदीप कुमार सिंह यांचीही उपस्थिती दर्शवण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल आमदार अब्दुल सत्तार, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामीण भागातील नागरिकांकडून नदीम पटेल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल नदीम पटेल यांनी राष्ट्रीय नेतृत्वाचे आभार मानले असून, मिळालेल्या जबाबदारीच्या माध्यमातून समाजसेवा अधिक प्रभावीपणे करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
What's Your Reaction?