नारेगावातून जवळपास तीन लाखांचा गांजा जप्त, दोन महीलांवर एनडिपिएस अंतर्गत गुन्हा दाखल...

 0
नारेगावातून जवळपास तीन लाखांचा गांजा जप्त, दोन महीलांवर एनडिपिएस अंतर्गत गुन्हा दाखल...

नारोगावात जवळपास तीन लाखांचा गांजा पकडला, दोन महिलांवर एनडीपीएसअंतर्गत गुन्हा...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15 (डि-24 न्यूज): शहरातील अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने नारेगाव येथील बलुच गल्ली परिसरात धडक कारवाई करत एकूण 5 किलो 176 ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत सुमारे 2 लाख 83 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन महिलांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे, पोलीस उपनिरीक्षक उशेश्वर मुंडे व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नारोगाव येथील बलुच गल्ली क्रमांक 9 परिसरात सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान एका महिलेकडून 3 किलो 596 ग्रॅम गांजा, दोन मोबाईल हँडसेट आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा 2 लाख 4 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्यानंतर परिसरात करण्यात आलेल्या झडतीत संबंधित महिलेच्या पत्र्याच्या टपरीतून आणखी 1 किलो 580 ग्रॅम गांजा, किंमत सुमारे 79 हजार रुपये, आढळून आला. अशाप्रकारे दोन्ही ठिकाणांहून एकूण 5 किलो 176 ग्रॅम गांजा, मोबाईल हँडसेट व इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा 2 लाख 83 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी दोन महिलांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ प्रतिबंधक (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद , पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहा पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे, मसपोनि वर्षा काळे, पोउपनि उत्रेश्वर मुंडे, पोह भाऊसिंग चव्हाण, पोह नारायण पायघन, पोअं सतिश जाधव, मपोअं छाया लांडगे, पोअं देशराज मोरे, सरताज पठाण, विशाल मेटे, चालक पोअं विठ्ठल पवार सर्व नेमणूक अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग यांच्या पथकाने केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow