प्रभात प्रचार फेरीत मंत्री अतुल सावे यांनी घेतली नागरीकांची भेट

 0
प्रभात प्रचार फेरीत मंत्री अतुल सावे यांनी घेतली नागरीकांची भेट

प्रभात प्रचार फेरीत मंत्री सावे यांनी घेतली नागरिकांची भेट

महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांची उपस्थिती 

औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे आणि राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांनी पूर्व मतदार संघात प्रभात प्रचार फेरी करत नागरिकांच्या भेटी गाठी घेतल्या.

लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करून केंद्रात 400 पेक्षा अधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रचार केला जात आहे. अशात शहरातील पूर्व मतदार संघात रविवारी राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात प्रभात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीपान भुमरे यांची उपस्थिती होती.

पूर्व मतदार संघातील एन 8 येथील बॉटनिकल गार्डन, एन 5 अधिक धर्मवीर संभाजी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, एन 2 मधील क्रिकेट मैदान, तसेच एमजीएम परिसरातील स्पोर्ट उपहार गृह मध्ये नागरिकांच्या भेठी गाठी घेत त्यांच्या सोबत मंत्री श्री अतुल सावे आणि महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी संवाद साधत यावेळी केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी धनुष्य बाण या चिन्हावर मतदान करून महायुतीचा उमेदवार विजयी करावे असे आवाहन करण्यात आले.

या प्रसंगी बापू घडामोडे, शिवाजी दांडगे, प्रशांत देसरडा, दामू अण्णा शिंदे, लक्ष्मीकांत थेठे, बालाजी मुंडे, नितीन खरात, विवेक राठोड, राम दसपुते, अमेय देशमुख यांच्या भाजप, शिवसेना, तसेच महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow