देशाच्या उज्वल भविष्यासाठी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना विजयी करा - मंत्री अतुल सावे
देशाच्या उज्वल भविष्यासाठी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना विजयी करा :- मंत्री अतुल सावे
पदयात्रेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद
औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) विकसित भारताचे संकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच बरोबर देशाच्या उज्वल भविष्यासाठी नागरिकांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवून केंद्रात त्यांचे हात अधिक मजबूत करण्यासाठी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना निवडून द्यावे, अशी साद राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा पूर्व मतदार संघाचे आमदार श्री अतुल सावे यांनी केले.
रविवारी मंत्री श्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात पूर्व मतदार संघात महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचार करण्यासाठी विद्यानगर मेहरनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रे दरम्यान त्यांनी नागरिकांना साद घातली. यावेळी त्यांनी घरोघरी जात नागरिकांना पत्रक वाटली.
पदयात्रा दरम्यान ठिकठिकाणी महिलांनी मंत्री श्री अतुल सावे यांचे औक्षण केले, त्याच बरोबर फटाके फोडत, ढोल वाजवत मोठ्या उत्साहात पदयात्रा काढण्यात आली.
या प्रसंगी मंगलमूर्ती शास्त्री, गोविंद केंद्रे, लक्ष्मीकांत थेठे, बालाजी मुंडे, विवेक राठोड, अशोक दामले, धीरज केंद्रे, शैलेश हेकाडे, रामदास दसपुते, त्र्यंबक राजपूत, संतोष काळे, सुवर्णा धानोरकर, गीता कापुरे, राहुल दांडगे, सागर प्रसाद यांच्या महायुती मधील घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
What's Your Reaction?