मुख्यमंत्री जाताच शिंदे गटाला धक्का, पश्चिमचे शहरप्रमुख संजय बारवाल यांची घरवापसी
मुख्यमंत्री शिंदे जाताच शिंदे गटाला धक्का...
पश्चिमचे शहरप्रमुख संजय बारवाल यांची घरवापसी
औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिंदे गटाला धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे शहरातून जाताच पश्चिमचे शहरप्रमुख संजय बारवाल यांनी घरवापसी केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री निवासस्थानी संजय बारवाल यांना शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला. यावेळी शिवसेना उपनेते विनोद घोसळकर, शहरप्रमुख विजय वाघचौरे, माजी नगरसेवक अविनाश कुमावत, शिवसैनिक संतोष बारवाल, सागर वाघचौरे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?