मोर्चा काढणा-यांना इम्तियाज जलिल यांनी दिल्या शुभेच्छा...

मोर्चा काढणा-यांना इम्तियाज जलिल यांनी दिल्या शुभेच्छा...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज),
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांच्यावर गुन्हा दाखल असताना आतापर्यंत अटक करण्यात आली नाही. त्यांना पोलिसांनी अटक करावी या मागणीसाठी सकाळी 11 वाजता क्रांतीचौक येथून पोलिस आयुक्त कार्यालयापर्यंत भव्य जन अक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. जनतेने मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे यासाठी आजच्या वर्तमानपत्रात मोठमोठ्या जाहिराती झळकल्या आहेत. इम्तियाज जलिल यांना मोर्चा बद्दल आमच्या प्रतिनिधीने प्रश्न विचारले असता त्यांनी मोर्चा काढणा-यांना शुभेच्छा देत म्हटले आहे मी कधीही लोकप्रतिनिधी असताना जातीयवाद केला नाही सर्व जाती धर्माचे प्रश्न सदनात उपस्थित केले. धर्माचे राजकारण मी करत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेघर करण्यात आलेले कुटुंब संसार थाटुन मागिल दोन महीन्यांपासून बसलेले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजाकडून कोणी पुढाकार घेतला नाही. जिल्हाधिकारी समोरुन जातात पण तेथे थांबून आतापर्यंत त्या कुटुंबाची व्यथा जाणून घेतली नाही म्हणून सकाळी माझ्या विरोधात निघणारा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
What's Your Reaction?






