रेल्वे मार्गाच्या कामामुळे दोन एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलले

 0
रेल्वे मार्गाच्या कामामुळे दोन एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलले

रेल्वेमार्गाच्या कामामुळे दोन एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग बदलले

11 ऑगस्ट रोजी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन

नांदेड, दि.3(डि-24 न्यूज)-

भुसावळ विभागातील भादली रेल्वे स्थानक परिसरात पाचव्या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग व नॉन इंटरलॉकिंगची महत्त्वाची कामे हाती घेण्यात येत आहेत. या कामांमुळे दक्षिण मध्य रेल्वेने काही प्रवासी रेल्वेगाड्यांच्या मार्गात तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट 2026 रोजी सुटणारी गाडी क्र. 17019 हिसार–हैदराबाद एक्सप्रेस ही नियमित मार्गाऐवजी भुसावळ–अकोला–पूर्णा मार्गे धावणार आहे. तसेच, त्याच दिवशी सुटणारी गाडी क्र. 12716 अमृतसर–नांदेड एक्सप्रेस हिचाही मार्ग बदलून भुसावळ–अकोला–पूर्णा मार्गे करण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित रेल्वेगाडीचे अद्ययावत वेळापत्रक व मार्गाची माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow