शहर पोलिसांची मोठी कारवाई, जीन्सी परिसरातून 131 गोवंश जप्त, 60 लाखांचा मुद्देमाल जप्त, 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल...!

 0
शहर पोलिसांची मोठी कारवाई, जीन्सी परिसरातून 131 गोवंश जप्त, 60 लाखांचा मुद्देमाल जप्त, 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल...!

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांची विशेष कारवाई...

जीन्सी परिसरातून 60 लाखांहून अधिक किमतीचा गोवंश जप्तीने खळबळ, आठ आरोपी विरोधात गुन्हा दाखल...

131 गोवंशांची सुटका; 8 आरोपींवर 4 गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)- बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली जीन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत संजयनगर येथे करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण 131 गोवंशांची सुटका करण्यात आली असून, सुमारे 60 लाख रुपयांहून अधिक किमतीचा गोवंश जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 8 आरोपींविरुद्ध 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधितांकडून अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध गोवंश वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पुढील काळातही अशाच प्रकारच्या विशेष कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हि कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त प्रशांत मोहीते, पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, पोलिस निरीक्षक जीन्सीचे शिवाजी बुधवंत

व पथकाने केली आहे. गोवंश जप्त करुन दुपारी जीन्सी पोलिस ठाण्यात पोलिसांनी सुरक्षित आणली तेव्हा बघ्यांची गर्दी जमली

होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow