डॉ.शादाब शेख यांच्याकडे मराठवाडा प्रभारी पदाची जबाबदारी

 0
डॉ.शादाब शेख यांच्याकडे मराठवाडा प्रभारी पदाची जबाबदारी

महाराष्ट्र NSUI चे उपाध्यक्ष डॉ. शादाब शेख यांच्यावर मराठवाडा विभाग प्रभारीपदाची अतिरिक्त जबाबदारी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज)- NSUI महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉ. शादाब अब्दुल रहेमान शेख यांच्यावर संघटनेच्या वतीने मराठवाडा विभाग प्रभारीपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. NSUI महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. सागर सालुंके यांनी NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विनोद जाखड यांच्या मान्यतेने ही नियुक्ती केली आहे.

डॉ. शादाब शेख हे विद्यार्थी हितासाठी सातत्याने कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या समस्या, हक्क आणि प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतात. संघटनेप्रती असलेली निष्ठा, मेहनत आणि सक्रिय कार्यपद्धती यांची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मराठवाडा विभाग प्रभारी म्हणून काम करताना मराठवाड्यात NSUI संघटनेचा विस्तार करणे, महाविद्यालयीन स्तरावर संघटना अधिक मजबूत करणे आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे संघर्ष करणे, यावर डॉ. शादाब शेख यांचा विशेष भर राहणार आहे.

या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करणाऱ्यांमध्ये काँग्रेस प्रवक्ते आलोक शर्मा, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आरिफ नसीम खान, खासदार डॉ. कल्याण काळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार एम. एम. शेख, माजी आमदार सिराज देशमुख, प्रकाश मुगदिया, कमाल फारुकी, मोहन देशमुख, हमाद चाऊस, युसूफ शेख, किरण डोंगावकर, शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्रम, नगराध्यक्ष आमेर पटेल, आमेर अब्दुल सलीम, मजहर पटेल, माजिद मनियार, डॉ. सरताज पठाण, सागर मुगदिया, खलील सर, इंजिनिअर इफ्तेखार, अनीस पटेल, जावेद बेग, ऋषिकेश खंडागळे, सूरज पाटील, NSUI जिल्हाध्यक्ष अभिषेक शिंदे, नाझिम खान, माजेद पटेल, डॉ. शुभम हजारे, इरफान सय्यद, स्वराज इंगळे , एजाज शेख आणि माजिद निजामी यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

या अतिरिक्त जबाबदारीबद्दल डॉ. शादाब शेख यांनी संघटनेच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार व्यक्त केले. तसेच, नेतृत्वाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत मराठवाड्यात NSUI संघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow