बुधवारी कटकट गेट येथे अतिक्रमण हटाव पथकाची कारवाई होणार...
बुधवारी कटकट गेट येथे अतिक्रमण हटाव पथकाची कारवाई होणार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज)- शनिवारी रोशन गेट ते चंपा चौक हा रस्ता अतिक्रमण मुक्त केल्यानंतर आता अतिक्रमण हटाव पथकाचा मोर्चा कटकट गेट, नेहरु नगर रस्त्यावर वळला आहे. महापालिका प्रशासनाने आज चंपा चौक ते कटकट गेट पोलिस मेस पर्यंत गाडीवर भोंगा लावून येथील नागरिकांना सुचित केले आहे रस्त्यावर अडथळा निर्माण होईल असे कोणतेही अतिक्रमण असेल तर काढून घ्यावे. टिन शेड, ओटे, टप-या, अवैध दुकाने असतील ती स्वतः काढून घ्यावे नसता बुधवारी महापालिकेच्या जेसीबीच्या सहाय्याने ते अतिक्रमण काढले जाईल महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. कटकट गेट ते पोलिस मेस रोड या रस्त्यावर नेहमी ट्राफीक जाम होत असल्याने पादचाऱ्यांना पायी चालणे अथवा वाहन चालवताना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत म्हणून हि कारवाई केली जात असल्याचे अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले आहे.
What's Your Reaction?