शिवसेना आमदार सतीश चव्हाण यांचे तन-मन-धनाने काम करणार - मंत्री संजय शिरसाट
शिवसेना मराठवाड्यात आमदार सतीश चव्हाण यांचे तन-मन-धनाने काम करणार...
संजय शिरसाट यांची पत्रकार परिषदेत घोषणा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज)- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत शिवसेना मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांचे तन-मन-धनाने काम करून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही एकदिलाने काम करू असे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
अमरावती शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महायुतीच्या अधिकृत उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिला असल्याच्या गैरसमजातून शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दोन दिवसापूर्वी माध्यमांना औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत शिवसेना महायुतीच्या उमेदवाराला पाठींबा देणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र हा झालेला गैरसमज अखेर दूर झाला असून आज संजय शिरसाट आणि आमदार सतीश चव्हाण यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मराठवाड्यात निर्माण झालेला हा संभ्रम दूर केला.
या पत्रकार परिषदेत बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, शिवसेनेचा मराठवाड्यात महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांना जाहीर पाठींबा असून गैरसमजातून महायुतीत जो बेबनाव किंवा जे वादळ निर्माण झाले होते ते आता शमलेले आहे. पदवीधर मतदारसंघात शिवसेना ही पूर्ण ताकदीनीशी मराठवाडा पदवीधर मतदारसंघात आमदार सतीश चव्हाण यांच्या पाठीशी उभी राहील असे त्यांनी सांगितले.
तर महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण म्हणाले की, दोन दिवसापूर्वी महायुतीत जो काही गैरसमज निर्माण झाला होता तो आमच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठक घेऊन दूर केला आहे. त्यामुळे आता आम्ही महायुती म्हणून या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत सामोरे जात असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सां
गितले.
What's Your Reaction?