महापालिकेची स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी, सर्वेशनात देशात 25 वा क्रमांक...

महानगरपालिकेची स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी, स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये देशात 25 वा क्रमांक...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) - महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत देशात 25 वा क्रमांक मिळवला आहे. तसेच हागणदारी मुक्त शहरे (ODF City) या मध्ये सर्वोच्च असे वॉटर प्लस (Water+) मानांकन शहराला मिळाले व कचरा मुक्त शहर या मध्ये एक स्टार सुद्धा शहराला प्राप्त झाला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे ही यशस्वी उपलब्धी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेस प्राप्त झाली आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन या योजने अंतर्गत देशातील सर्व शहरे स्वच्छ होण्याच्या दृष्टीने "स्वच्छ सर्वेक्षण" ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते त्यात शहर स्वच्छतेच्या दृष्टीने विविध मानांकनावर परीक्षण गुणांकन केले जाते. त्यात ह्या वर्षी इंदोर शहराने विशेष क्रमांक मिळवला व अहमदाबाद शहराने प्रथम क्रमांक मिळवला तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने 25 वा क्रमांक पटकावला.
घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि स्वच्छतेचे धोरण राबवून
महानगरपालिकेने कचरा संग्रहण, वाहतूक आणि विल्हेवाट यावर भर देऊन स्वच्छता अभियानात लक्षणीय प्रगती केली आहे. विभागाच्या नियोजित कार्यपद्धती, तंत्रज्ञानाचा वापर आणि नागरिकांच्या सहभागामुळे ही उपलब्धी शक्य झाली आहे तसेच नागरिकांचा सक्रिय सहभागाने हे शक्य झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छ सर्वेक्षण साठी केलेल्या विविध उपाययोजना ज्यात घरोघरी कचरा संकलन, कचरा वाहतूक, घनकचरा प्रक्रिया केंद्र, पडीत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग, सांडपाण्याचा प्रक्रिया करून प्रभावीपणे पुनर्वापर, शहरातील रस्ते स्वच्छतेबद्दल नियोजन, वृक्षारोपण, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे सेंटर, शहर सौंदर्यकरण, प्लास्टिक बंदी, जैविक कचऱ्यापासून खत निमिर्ती, नागरिकांसाठी माझा स्वच्छतासाथी अँप, शहर स्वच्छतेबद्दल जनजागृती कार्यक्रम,शालेय विध्यार्थ्यांना कचरा विलानीकरण कार्यक्रम, इ गोष्टींवर भर दिल्याने स्वच्छ सर्वेक्षण मध्ये यावेळी शहराचे मानांकन सुधारले.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त श्री. जि श्रीकांत साहेब यांनी सांगितले की यावर्षी प्रथम दहामध्ये येण्यापासून राहिलेल्या गोष्टींची पूर्तता करून शहर प्रथम दहामध्ये येण्यासाठी कचरा वर्गीकरण वाढवणे, नारेगाव येथील साचलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्या जागेवर सुशिभीकरण करणे, राडारोडा प्रक्रिया केंद्र (C&D Plant), सार्वजनिक शौचालय संख्या वाढवणे, शहर सौदर्यकरण, ई-कचरा प्रक्रिया केंद्र, नागरिकांचा सहभाग वाढविणे, व्यावसायिक क्षेत्रामध्ये ट्वीन बिन बसवणे, पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी, मोठ्या प्रमाणात शहर हरित करण्यासाठी वृक्षारोपण करणे, इ वर विशेष लक्ष देण्यात येईल.
उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख श्री. नंदकिशोर भोंबे साहेब यांनी सांगितले की आयुक्त महोदय यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून शहर प्रथम दहा मध्ये येण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व कर्मचारी तसेच घनकचरा प्रक्रिया केंद्रात प्रभावी पणे आलेल्या कचऱ्यावर प्रकिया करून खत निमिर्ती केली जाईल, तसेच शहरातील जमा होणारा हरित कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून ब्रिकेट बनविले जाईल, शहरातील सर्व प्रमुख रस्ते नियमितपणे रात्रीच्या वेळी यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करून स्वच्छ केले जाईल त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था व दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे, शहरातील सर्व व्यावसायिक भागामध्ये प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबविल्या जाणार आहे, शहरातील सर्व नागरिक-व्यावसायिक यांना स्वच्छ सर्वेक्षण या अभियानामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे.
तसेच आयुक्त श्री. जि श्रीकांत सरांनी केलेल्या "छत्रपती संभाजीनगर एक नंबर" या घोषणेला अनुसरून शहर स्वच्छ, हरित, सुंदर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल असेही उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले.
What's Your Reaction?






