शारेक नक्शबंदी यांची एमआयएमच्या जिल्हाध्यक्ष पदी वर्णी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह...!
एमआयएमच्या जिल्हाध्यक्ष पदी शारेक नक्शबंदी यांची वर्णी... कार्याध्यक्ष पदी जावेद पटेल
जिल्हाध्यक्ष शारेक नक्शबंदी, जिल्हा कार्याध्यक्ष जावेद पटेल, जिल्हा सचिव पवन गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष इद्रीस नवाब
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(प्रतिनिधी) - पक्षात सक्रीय भुमिकेत असलेले शारेक नक्शबंदी यांची एमआयएम पक्षाने जिल्हाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे. अशी माहिती सोशलमिडीयावर प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली आहे. नियुक्तीनंतर पदाधिकारी कार्यकर्ते शारेक नक्शबंदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. शारेक नक्शबंदी हे नेहमी पक्षाची भुमिका विविध व्यासपीठावर ठामपणे मांडतात. सहा वर्षे शहराध्यक्ष असताना अनेक आंदोलने त्यांच्या नेतृत्वाखाली अक्रामकपणे झाली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत व महापालिका निवडणुकीत त्यांची उत्तम कामगिरी राहीली म्हणून एमआयएमचे सर्वेसर्वा बॅ.असदोद्दीन ओवेसी यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी विश्वास टाकून जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवली आहे. निवड झाल्यानंतर जिल्ह्यात व तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नक्शबंदी यांनी जळगाव पक्ष निरीक्षक म्हणून पक्षाची जबाबदारी सांभाळली तर बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दौरे केले.
एमआयएमच्या जिल्हाध्यक्षपदी शारेक नक्षबंदी, कार्याध्यक्षपदी जावेद पटेल यांची नियुक्ती
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने शारेक नक्षबंदी यांची जिल्हाध्यक्षपदी, तर जावेद पटेल यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
शारेक नक्षबंदी आणि जावेद पटेल हे दोघेही पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित असून, गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या संघटनात्मक कामात सक्रियपणे कार्यरत आहेत. शारेक नक्षबंदी यांनी यापूर्वी शहराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे, तर जावेद पटेल यांनी जिल्हा युवा कार्याध्यक्ष म्हणून पक्षाची जबाबदारी सांभाळली आहे.
दोघांनीही पक्षवाढीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर नव्या जबाबदाऱ्या सोपवल्या. यावेळी त्यांनी दोघांनाही पुढील वाटचालीस शुभेच्छा देत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रभावीपणे काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.
या नियुक्तीनंतर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध स्तरांतील नागरिकांकडून शारेक नक्षबंदी आणि जावेद पटेल यांचे अभिनंदन करण्यात
येत आहे.
What's Your Reaction?