इकरा उर्दू शाळेचा विद्यार्थी सोहेल खान यांचे नीट परीक्षेत घवघवीत यश...!

 0
इकरा उर्दू शाळेचा विद्यार्थी सोहेल खान यांचे नीट परीक्षेत घवघवीत यश...!

इकरा उर्दू शाळेचा विद्यार्थी सोहेल खान याला नीटमध्ये 628 गुण, AIR मध्ये 3689

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) - काल उशिरा रात्री नीट(युजी) परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला. छत्रपती संभाजीनगर येथील इकरा उर्दू शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मार्टी कृती समितीचे सर्वेसर्वा एड अझर पठाण यांचा मुलगा सोहेल खान याने 720 गुणांपैकी 628 गुण घेत घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच त्याने 99.8093400 पर्सेंटाइल प्राप्त करत अखिल भारतीय क्रमवारीत(AIR) 3689 वा क्रमांक पटकावला असून General -EWS प्रवर्गात 346 वा क्रमांक प्राप्त केला आहे. एड अझर पठाण नेहमी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात पुढे जावे यासाठी शासकीय स्तरावर मार्टीच्या माध्यमातून प्रमाणिक प्रयत्न करत असल्याने महाराष्ट्रातून त्यांना व त्यांच्या मुलाचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या जात आहे. अकरावी व बारावीचे शिक्षण सोहेलने माऊंट व्हॅली इंग्लिश हायस्कूल मधून पूर्ण केले तर नांदेड येथील शाईन अकाडमीत नीट परीक्षेची तयारी केली होती. त्यांनी या यशाचे श्रेय त्या मुलाची जिद्द, परिश्रम व शाईन अकाडमी नांदेड येथील शिक्षकांना दिले आहे. महाराष्ट्रातील नामांकित मेडीकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow