क्राईम रिपोर्टर तथा समाजसेवक अलिम बेग यांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव
क्राईम रिपोर्टर तथा समाजसेवक अलीम बेग यांना 'समाजरत्न' पुरस्काराने गौरव
छत्रपती संभाजीनगर, दि. १७ (प्रतिनिधी) – पत्रकारिता आणि समाजसेवा या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे 'युवा शक्ती' या दैनिकाचे क्राईम रिपोर्टर तथा समाजसेवक अलीम बेग यांना राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने 'समाजरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतरत्न मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात राज्यभरातील अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
अलीम बेग हे गेल्या अनेक वर्षांपासून 'युवा शक्ती' या दैनिकामध्ये क्राईम रिपोर्टर म्हणून कार्यरत असून, त्यांनी निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि जनहिताची पत्रकारिता करत समाजातील विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली आहे. गुन्हेगारी घटनांचे अचूक वृत्तांकन करण्याबरोबरच सामाजिक प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी आणि लोकहिताच्या विषयांवर त्यांनी सातत्याने लेखणी चालविली आहे. पत्रकारितेतील त्यांच्या प्रामाणिक कार्यामुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
पत्रकारितेसोबतच सामाजिक क्षेत्रातही अलीम बेग यांनी मोलाचे योगदान दिले आहे. विशेषतः महाराष्ट्र मुस्लिम मेहतर समाजाच्या विविध समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. समाजातील वंचित, दुर्लक्षित आणि गरजू घटकांच्या न्यायहक्कासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले असून, प्रशासनाकडे पाठपुरावा करून विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम त्यांनी निःस्वार्थपणे केले आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची दखल घेत राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीने त्यांना 'समाजरत्न' पुरस्काराने सन्मानित केले.
राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीचे राष्ट्रीय प्रमुख सय्यद साबेर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने समिती दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख, दामिनी पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक लता जाधव, 'एशिया एक्स्प्रेस'चे संपादक शारेक नक्शबंदी, खुलताबादचे नगराध्यक्ष आमेर पटेल, राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीचे राष्ट्रीय प्रमुख सय्यद साबेर, संस्थापक सचिव मोहम्मद अखिल अहमद रामपुरे, मालेगावचे माजी नगरसेवक शेख शफीक, हमिदोद्दीन शमशोद्दीन, महाराष्ट्र उपाध्यक्ष अब्दुल कय्यूम, मराठवाडा अध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी, हाफीज अली तसेच समाजसेवक साजिद मौलाना, महाराष्ट्र मुस्लिम मेहतर समाजाचे पदाधिकारी एजाज बेग यांच्यासह समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते अलीम बेग यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पत्रकारिता व समाजसेवेतील योगदानाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन एम. एम. शेख यांनी केले, तर राजकुमार सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
दरम्यान, 'समाजरत्न' पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल क्राईम रिपोर्टर तथा समाजसेवक अलीम बेग यांच्यावर पत्रकार, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक आणि पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात ये
त आहेत.
What's Your Reaction?