एमआयएम पहिल्यांदाच विधानपरिषद निवडणुकीच्या मैदानात...!

 0
एमआयएम पहिल्यांदाच विधानपरिषद निवडणुकीच्या मैदानात...!

एमआयएम पहिल्यांदाच विधानपरिषद निवडणुकीच्या मैदानात...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज)- एमआयएम (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन) पक्ष पहिल्यांदाच औरंगाबाद - जालना विधानपरिषद निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. या निवडणुकीत हाजी इसाक खान यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत 24 तर या निवडणुकीत पक्षाकडे 36 मते आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांना मते दिल्याचा आरोप झाला होता. परंतु पुन्हा असले आरोप होऊ नये म्हणून तर नाही ना एमआयएमने आपल्या पक्षाचा उमेदवार उभा केला असेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अथवा माघार घेवून भाजपाला रोखण्यासाठी जो पक्षाचा उमेदवार टक्कर देईल त्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल अशीही रणनिती प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची असेल अशीही चर्चा आहे. आज दुपारी तीन वाजेच्या अगोदर हाजी इसाक खान यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर, गटनेते हाजी शेरखान, माजी शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, नगरसेवक काकासाहेब काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी प्रतिक्रिया देताना विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी सांगितले आम्ही भाजपाला रोखण्यासाठी उमेदवारी दाखल केली आहे. जे पक्ष भाजपाला रोखण्यासाठी आमच्या सोबत यायचे त्यांना आवाहन केले आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील काही अपक्ष निवडून आलेले नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आमच्या संपर्कात आहेत. आणखी मतदारांना आपल्याकडे येण्यासाठी वरिष्ठ नेते चर्चा करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow