ऑनलाईन पावती बंद करण्याची चंद्रकांत खैरे यांची मागणी
 
                                ऑनलाईन पावती बंद करण्याची चंद्रकांत खैरे यांची मागणी... पोलिस आयुक्त यांची भेट घेत केली मागणी...
औरंगाबाद, दि.21(डि-24 न्यूज)
ऑटो चालकांना रस्त्यावर वाहतूक करताना ऑनलाईन पावती दिली जात आहे मनमानी चालान दिले जात असल्याने आर्थिक फटका बसत असल्याने ऑटोचालक मालक त्रस्त झाले आहेत. वेळोवेळी विविध संघटनांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली येथे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी रिक्षा चालक मालक, वाहन धारक त्रस्त झाले असून ऑनलाइन पावती बंद करण्याची मागणी केली.
यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी, राजू इंगळे, शेख रब्बानीआदीसह रिक्षा चालक उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            