काँग्रेसचे नवीन शहराध्यक्ष एड सय्यद अक्रम तर किरण पाटील डोणगावकर यांच्याकडे पुन्हा जिल्हाध्यक्ष पद...!
अॅड सय्यद अक्रम काँग्रेसचे नवीन शहराध्यक्ष, किरण पाटील डोणगावकर यांच्याकडे पुन्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पद...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज)- आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रातील काही शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांची घोषणा थेट दिल्लीतून केली आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी पुन्हा किरण पाटील डोणगावकर यांना पक्षाने संधी दिली आहे तर शहराध्यक्ष पदासाठी अनेक चेहरे इच्छुक असताना युवा व दिलदार नेत्याची ओळख असलेले एड सय्यद अक्रम यांच्याकडे जवाबदारी दिली आहे. त्यांचा अक्रामक राजकीय कारकीर्द व संघटन कौशल्य यामुळे त्यांची या पदासाठी निवड झाली असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. एड सय्यद अक्रम हे एवढी वर्षे काँग्रेस सोबत एकनिष्ठ राहिले पद असो किंवा नसो त्यांनी कधीही काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला अनेक आंदोलनात अक्रामकपणे सहभाग घेतला याचा इनाम पक्षाने दिला खरा पण भिविष्यात शहरात पक्षाला आलेली उतरती कळा संपवून मजबूत करण्याचे आवाहन आहे. महापालिकेत एकमेव नगरसेविका निवडून आली तर शहरात एकही आमदार नाही. पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अक्रम यांनी सन 2014 मध्ये शहराध्यक्ष पद व त्यापूर्वी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जवाबदारी सांभाळली आहे.
16 जिल्हा व शहराध्यक्ष जाहीर...
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष निवडीसाठी सृजन अभियान राबविले. प्रत्येक शहर व जिल्ह्यात निरीक्षक नेमून काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्ष श्रेष्ठीकडे अहवाल सादर केला यानंतर त्यांनी हे पद जाहीर केले आहे.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष एड सय्यद अक्रम, अहिल्या नगर( अहमदनगर) शहर जिल्हाध्यक्ष दिप चौव्हाण, अहमदनगर नाॅर्थ ग्रामीण जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, अहमदनगर रुरल साऊथ किरण अण्णासाहेब पाटील, अकोला जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गवई, अमरावती शहर जिल्हाध्यक्ष बबलू उर्फ नीतीराज शेखावत, बीड शहराध्यक्ष राहुल सोनवणे, भंडारा मुकुंद सखरकर, भिवंडी शहराध्यक्ष आबीद खान मुनाफ, बुलढाणा प्रकाश औचर, चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष शिवा राव पोलीशेट्टी, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, धाराशिव (उस्मानाबाद) उमेश राजे निंबाळकर, धुळे शहराध्यक्ष खान मोहम्मद साबेर, धुळे जिल्हाध्यक्ष युवराज कर्नलकर, डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष अमीत म्हेत्रे, गडचिरोली विश्वजित कोवासे, गोंदीया अमर वराडे, हिंगोली डॉ.सतीश पाचपुते, इचलकरंजी शहराध्यक्ष संजय कांबळे, जळगाव शहराध्यक्ष जमील शेख यांची निवड करण्यात आली आहे. पद मिळणा-या नेत्यांचे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?