लाईन ब्लॉकमुळे काही रेल्वे तात्पूरत्या रद्द...प्रवाशांनी नोंद घ्यावी

 0
लाईन ब्लॉकमुळे काही रेल्वे तात्पूरत्या रद्द...प्रवाशांनी नोंद घ्यावी

लाईन ब्लॉक मूळे काही रेल्वे तात्पुरत्या रद्द... 

नांदेड,दि.23(डि-24 न्यूज)

मथुरा रेल्वे स्थानकावर यार्ड रेमॉडेलिंग चे कार्य करण्याकरिता घेण्यात येणाऱ्या मेगा लाईन ब्लॉक मूळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याचे उत्तर मध्य रेल्वे ने कळविले आहे, ते पुढील प्रमाणे-

रद्द करण्यात आलेल्या गाड्या : 

 नांदेड येथून सुटणारी गाडी क्र. 12715 नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस दिनांक 21 जानेवारी ते 04 फेब्रुवारी, 2024 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

अमृतसर येथून सुटणारी गाडी क्र. 12716 अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस दिनांक 23 जानेवारी ते 06 फेब्रुवारी, 2024 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. 

 नांदेड येथून सुटणारी गाडी क्र. 12751 नांदेड-जम्मू तावी हमसफर साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 26 जानेवारी आणि 02 फेब्रुवारी, 2024 रोजी रद्द करण्यात आली आहे. 

जम्मू तावी येथून सुटणारी गाडी क्र. 12752 जम्मू तावी-नांदेड हमसफर साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 28 जानेवारी आणि 04 फेब्रुवारी, 2024 रोजी रद्द करण्यात आली आहे. 

 नांदेड येथून सुटणारी गाडी क्र. 12753 नांदेड-हजरत निजमुदिन साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 23 आणि 30 जानेवारी, 2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.

हजरत निजमुदिन येथून सुटणारी गाडी क्र. 12754 हजरत निजमुदिन- नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 24 आणि 31 जानेवारी, 2024 रोजी रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे जनसंपर्क विभाग, नांदेड यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow