गणेशोत्सव 2026: गणेशमूर्ती विक्री स्टाॅलचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते उद्घाटन

 0
गणेशोत्सव 2026:  गणेशमूर्ती विक्री स्टाॅलचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते उद्घाटन

गणपती महोत्सव 2026:गणेशमूर्ती विक्री स्टॉलचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते उद्घघाटन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 13(डि-24 न्यूज)- उमेद स्वयंसहायता समूह, ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या गणपतीची मूर्ती विक्री करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या वर्षीही गणपती महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे आज या विक्री स्टॉलचे उद्घघाटन सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, समाज कल्याण सभापती बालाजी सोनटक्के, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके उपस्थित होते

            स्वयं सहायता समूहांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी शासनाच्या वतीने लागणारी मदत देण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न करणार तसेच मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे श्री. शिरसाट यांनी सांगितले. जिल्हा परिषदेने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

      जिल्ह्यातून गतवर्षी बचत गटाच्या माध्यमातून गणेश मूर्ती विक्रीतून तब्बल 6.93 कोटी रुपयांची उलाढाल केली ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूला विक्रीसाठी जिल्हा पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून 20 कोटी रुपये उमेद मॉल करिता मंजूर झालेले आहेत तसेच महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देणार तसेच उमेद अभियानातील स्वयंसहायता मध्ये सामील असलेल्या दीदी यांना माननीय पंतप्रधान व माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेनुसार लखपती दीदी करण्यासाठी उमेद अभियाना मधून प्रयत्न केले जातात, जिल्ह्यात सद्यस्थित 21 हजार 528 समूह स्थापन झालेले आहेत यामध्ये 942 ग्राम संघ,61 प्रभागातील 61 प्रभाग संघ स्थापन झालेले असून सद्यस्थितीत ते कार्यरत आहेत उमेद समूहातील महिलांना मार्केटिंग साठी विमानतळ, छत्रपती संभाजीनगर व रोटेगाव रेल्वे स्थानकात स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले 

         या कार्यक्रमाला माजी महापौर तथा नगरसेवक त्र्यंबक तुपे, माजी महापौर नंदू घोडीले, जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर, जिल्हा मार्केटिंग व्यवस्थापक सचिन सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक सुचिता खोतकर, प्रज्ञा दाभाडे, बिभीषण भोईटे तसेच तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक, समुदाय कृषी व्यवस्थापक, समुदाय पशु व्यवस्थापक , जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहातील महिला व जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते आभार जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर यांनी मानले

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow