नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई भरती, समुपदेशनासाठी यादी संकेतस्थळावर...
नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदभरती;
समुपदेशनासाठी यादी संकेतस्थळावर येणार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)- नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई 'गट-ड' संवर्गात 284 पदांच्या भरती करीता आय.बी.पी.एस. कंपनीमार्फत माहे-जुलै-2025 मध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला व उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधुन सामाजिक व समांतर आरक्षणानुसार आणि गुणवत्तेनुसार उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी देखील पुर्ण करण्यात आली आहे. उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीअंती निवड यादी, प्रतिक्षा यादी, निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी, अपात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर उमेदवारांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर www.igrmaharashtra.gov.in यावर दि.10 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई 'गट-ड' संवर्गात निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीच्या अनुषंगाने समुपदेशनाकरीता बोलवण्यात येणार आहे त्याबाबत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर स्थळ व दिनांक लवकरच प्रसिध्द करण्यात येईल,असे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रविंद्र बिनवडे यांनी कळविले आहे.
What's Your Reaction?