राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे शहरात आगमन व स्वागत
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे
छत्रपती संभाजीनगर येथे आगमन
विमानतळावर स्वागत व मानवंदना
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या 67 वा वार्षिक दीक्षांत समारंभासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांचे आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर सकाळी 11 वाजता आगमन झाले. यावेळी पोलीस दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.
विमानतळावर त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ. विजय फुलारी यांनी स्वागत केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राध्यापक डॉ. प्रवीण वक्ते यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आदी उपस्थि
त होते.
What's Your Reaction?