20 वर्षे जुने जीव्हिपी पाॅईंट बंद, झोन 7 मध्ये मनपाचे स्वच्छता अभियान
झोन-7 येथे स्वछता अभियान...
20 वर्ष जुना जीव्हीपी पॉईंट कायमस्वरूपी बंद...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून झोन 7 अंतर्गत त्रिमूर्ती चौक ते तानाजी पुतळा चौक आज सकाळी 9 वाजता स्वच्छता रॅली व स्वछता अभियानचे आयोजन करणयात आले.
यावेळी उपायुक्त-5 तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख विजय पाटील, सहाय्यक आयुक्त राहुल जाधव यांची उपस्थिती होती.
यावेळी झोन क्र.7 मधील वॉर्ड क्र 74 , 75 , 76 ,77 या वॉर्ड अंतर्गत ज्ञान प्रोभोदिनी या शाळेच्या विद्यार्थ्यांना व शाळेच्या शिक्षकांना महानगरपालिकेच्या कर्मचार्यांना सोबत येऊन स्वछता रॅलीत सहभाग घेतला.
सदरील स्वछता माजी महानगरपालिका सदस्या अंकिता विधाते, झोनचे सर्व स्वच्छता निरीक्षक सचिन भालेराव, सचिन खरात, सचिन ठोकळ, सतीश खरात, योगेश भारसाकळे, अजय मुथा व जवान अशोक साबळे ,कीशोर घुसले , विनोद लोखंडे , सतीश आगळे , किशोर जाधव व सफाई कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
20 वर्ष जुने जीव्हीपी पॉईंट बंद...
झोन क्र 7 वार्ड क्र 76 येथील आकाशवाणी येथील 20 वर्षा पासून सर्वात मोठा असलेला जीव्हीपी पॉईंट कायमस्वरूपी बंद करण्यात आला यासाठी
स्वच्छता निरीक्षक सचिन भालेराव, सचिन खरात आणि सचिन ठोकळ यांनी परिश्रम
घेतले.
What's Your Reaction?