मंत्री अतुल सावे यांचे चिरंजीव अनुरागचा विवाह साधेपणाने होणार, मुख्यमंत्र्यांना दुष्काळासाठी एक कोटीचा धनादेश सुपूर्द

 0
मंत्री अतुल सावे यांचे चिरंजीव अनुरागचा विवाह साधेपणाने होणार, मुख्यमंत्र्यांना दुष्काळासाठी एक कोटीचा धनादेश सुपूर्द

मुलगा चि.अनुरागचा विवाह सोहळा घरगुती स्वरूपात साधेपणाने करणार.. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एक संवेदनशील निर्णय... विवाहावर होणाऱ्या खर्चात आपल्या उद्योगातील निधीची भर घालून सावे-मुळे परिवाराने शेतकरी बांधवांसाठी 1 कोटींचा निधी समर्पित केला आहे...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचा धाकटा मुलगा, उद्योजक चि.अनुराग याचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील प्रतिष्ठित उद्योजक श्री.अजित मुळे यांची सुकन्या चि.सौ.कां.ईशा हिच्याशी 25 नोव्हेंबर रोजी करण्याचे योजिले आहे.

पण दुर्दैवाने महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. विशेषतः मराठवाड्यात, आपला शेतकरी बांधव शेतीच्या नुकसानीमुळे अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत.

आपल्या महाराष्ट्र परिवारातील लाखो सदस्य संकटात असताना मोठा सोहळा साजरा करणे संयुक्तिक वाटले नाही.

स्व.मोरेश्वर सावे साहेबांपासून आपला परिवार सामाजिक कार्यात आणि उद्योग क्षेत्रात अग्रेसर आहे. तसेच मुळे परिवारदेखील उद्योग क्षेत्रात अग्रणी आहेत. दोन्ही कुटुंबांचा संपर्क मोठा आहे. परंपरेने संपर्कात असलेल्या हजारो लोकांना विवाहाच्या प्रसंगी सहभागी करण्याचे नियोजन होते. परंतु दुष्काळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दोन्ही परिवारांनी मिळून हा संवेदनशील निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सावे व मुळे कुटुंबातील सदस्यांनी एक कोटीचा धनादेश सुपूर्द केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow