पावसाळी नियंत्रण कक्षाच्या कामकाजांचा आयुक्तांनी घेतला आढावा, आपत्ती व्यवस्थापनासाठी महत्वपूर्ण सूचना...!

 0
पावसाळी नियंत्रण कक्षाच्या कामकाजांचा आयुक्तांनी घेतला आढावा, आपत्ती व्यवस्थापनासाठी महत्वपूर्ण सूचना...!

पावसाळी नियंत्रण कक्षाच्या कामकाजाचा आयुक्तांकडून आढावा; आपत्ती व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सूचना...

औरंगाबाद, दि. 24(डि-24 न्यूज) - महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत स्मार्ट सिटी कार्यालयातील पावसाळी नियंत्रण कक्ष येथे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस मनपा उपायुक्त अंकुश पांढरे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख स्वप्नील सरदार, अग्निशमन अधिकारी लोखंडे, आरआरटी सेल (आरोग्य विभाग) प्रमुख तसेच आयटी सेलचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आयुक्तांनी पावसाळी नियंत्रण कक्षातील उपस्थिती, तक्रार निवारण व्यवस्था व नागरिकांना तात्काळ मदत पोहोचविण्याच्या कार्यपद्धतीचा आढावा घेत विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

त्यामध्ये स्मार्ट सिटीच्या ICCC (Integrated Command and Control Centre) यंत्रणेचा आपत्तीपूर्व तयारी व आपत्कालीन प्रतिसादासाठी प्रभावी वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सखल भागांवर सातत्याने लक्ष ठेवून संबंधित विभागांना वेळेवर सूचना देण्याचे आदेश देण्यात आले.

शहरातील पूरप्रवण व पाणी साचणाऱ्या भागांची यादी तयार करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे, कॅमेरे नसलेल्या भागांमध्ये स्थानिक संपर्क नागरिकांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत परिस्थितीची माहिती मिळविणे व तक्रारींचे तातडीने निवारण करण्यावर भर देण्यात आला.

तसेच शहरातील अत्यावश्यक सेवा व महत्त्वाच्या ठिकाणांचे (Critical Infrastructure) मॅपिंग करून संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढविणे, पावसाळी नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे, स्मार्ट सिटी अंतर्गत बसविण्यात आलेली सार्वजनिक उद्घोषणा (Public Address System) 24x7 कार्यरत ठेवणे आणि त्याची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या चॅटबॉटमध्ये आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सेवांचे तात्काळ एकत्रीकरण (Integration) करण्याचे निर्देशही देण्यात आले. तसेच पदमपुरा फायर कंट्रोल रूमचा व्हॉट्सअॅप क्रमांक पावसाळी नियंत्रण कक्षाशी जोडून आपत्तीविषयक माहिती संबंधित अधिकारी व विभागांपर्यंत त्वरित पोहोचविण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

पावसाळ्यात नागरिकांना जलद, समन्वयित व प्रभावी सेवा उपलब्ध व्हाव्यात तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तत्परतेने प्रतिसाद देता यावा, या उद्देशाने वरील सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow