पोलिस आयुक्तालयातील 11 अधिकारी, अंमलदारांना पोलिस महासंचालक पदक जाहीर...!
पोलीस आयुक्तालयातील 11 अधिकारी-अंमलदारांना पोलीस महासंचालक पदक जाहीर...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)- महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे 206 रोजी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयातील 11 पोलीस अधिकारी व अंमलदारांना उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला.
सन्मानित अधिकारी व अंमलदारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
पोलीस निरीक्षक प्रविण यादव,
पोलीस उपनिरीक्षक (GPSI) नारायण पुरके, पोलीस उपनिरीक्षक (GPSI) हरिष खटावकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) सुधाकर मिसाळ,
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) महेंद्र चव्हाण,
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) दिलीप मोदी,
पोलीस हवालदार (HC) संजय गावंडे, पोलीस हवालदार (HC) अश्रफ सय्यद,
पोलीस हवालदार (HC) प्रकाश गायकवाड,
पोलीस हवालदार (HC) शफीक शेख,
पोलीस अंमलदार (PC) चत्तरसिंग जारवाल यांचा समावेश आहे.
सदर अधिकारी व अंमलदारांनी गुन्हे अन्वेषण, सायबर गुन्हे प्रतिबंध, वाहतूक नियंत्रण तसेच जनजागृती उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य करून पोलीस दलाची प्रतिष्ठा उंचावली आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना हा मानाचा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
या सर्व सन्मानित अधिकारी व अंमलदारांचा गौरव सोहळा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार असून, त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
याप्रसंगी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-1 पंकज अटलकर, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-2 प्रशांत स्वामी, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) शामिंधा वाळावलकर मंढळा, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले तसेच सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, अधिकारी व अंमलदारांनी सन्मानित कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?