मराठी शाळांच्या विकासासाठी नगरसेवक पदाचे मानधन महापौरांना सुपूर्द, ॠषीकेश जैस्वाल यांचा निर्णय...

 0
मराठी शाळांच्या विकासासाठी नगरसेवक पदाचे मानधन महापौरांना सुपूर्द, ॠषीकेश जैस्वाल यांचा निर्णय...

मराठी शाळाच्या विकासासाठी नगरसेवक पदाचे मानधन सुपूर्द... 

शिवसेना नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांचा स्तुत्य उपक्रम 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज)-: आज खासगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळा ओस पडत आहे. यामध्ये मराठी भाषा आणि शाळा टिकल्या पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नगरसेवक ऋषिकेश सरोज प्रदीप जैस्वाल यांनी पाच वर्ष मानधन स्वच्छेने स्वीकारणार नसल्याचे पत्र महापौर समीर राजूरकर यांना दिले. 2026-31 या पाच वर्षातील 60 महिन्याचे मानधन, सर्वसाधारण सभा भत्ता आणि इतर लाभाची रक्कम मराठी शाळेला देण्याची विनंती त्यांनी केली.

मराठवाडा विभागाची राजधानी असलेल्या या शहरांत नागरिकांच्या आशीर्वादाने मिळालेल्या नगरसेवक पदाचे भत्ते आम्ही नम्रपणे नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा व विद्यार्थी यांना आवश्यक साधने, खेळणी उपलब्ध व्हाव्यात, असे आवाहन प्रशासनाला जैस्वाल यांनी केले. प्रभागातील नागरिकांनी टाकलेल्या विश्वासाच्या ऋणातून उतराई होण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. नागरिकांच्या विविध कररुपी निधीतून मिळणारे मानधन हे पुन्हा त्यांच्याच सेवेसाठी खर्च व्हावे, या भावनेतून हा निर्णय घेतला. ही केवळ जनसेवेसाठी मिळालेली जबाबदारी असून, यातून मिळणारे समाधान आमच्यासाठी अधिक मोलाचे असल्याचे नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow