महापालिकेच्या 2026-27 अर्थसंकल्पासाठी नागरीकांकडून सूचना मागवल्या...!

 0
महापालिकेच्या 2026-27 अर्थसंकल्पासाठी नागरीकांकडून सूचना मागवल्या...!

महानगरपालिकेच्या 2026–27 अर्थसंकल्पासाठी नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) - महानगरपालिकेच्या 2026–27 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली असून शहराच्या विकासासाठी नागरिकांकडून सूचना व प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. शहरातील विविध विकासकामांचा समावेश अर्थसंकल्पात व्हावा यासाठी महानगरपालिकेने नागरिकांना आपले मत मांडण्याचे आवाहन केले आहे.

महानगरपालिकेने जारी केलेल्या जाहीर प्रगटनानुसार, शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि इतर महत्त्वाच्या विकासकामांबाबत नागरिकांनी आपले प्रस्ताव व सूचना पाठवाव्यात, असे सांगण्यात आले आहे.

नागरिकांना आपले प्रस्ताव महानगरपालिकेच्या chhsmcbudget2627@gmail.com या अधिकृत ई-मेल आयडीवर पाठवता येणार आहेत. तसेच इच्छुक नागरिकांना प्रत्यक्ष भेट देऊन मुख्य आवक-जावक कक्ष, टाऊन हॉल येथील महानगरपालिका कार्यालयातही आपल्या सूचना सादर करता येतील.

महानगरपालिकेने कळविल्यानुसार, नागरिकांनी आपल्या सूचना 12 मार्च 2026 ते 16 मार्च 2026 या कालावधीत पाठवाव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.

शहराच्या विकासासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन शहराच्या प्रगतीसाठी उपयुक्त सूचना द्याव्यात, असे आवाहन महानगरपालिका आयुक्तांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow